प्रतिनिधी
मुंबई : खासदार राहुल गांधींनी उद्योगपती गौतम अदानींना सातत्याने टार्गेट वर ठेवले असले तरी शरद पवार गौतम अदानींच्या भेटीगाठी घेण्याचे थांबवत नाहीत, हे पाहूनच बारामतीच्या शेतकऱ्याने शदर पवार आणि गौतम अदानींना एकत्र आणण्याची “करामत” गुजरात मध्ये करून दाखविली.Baramati farmer’s “miracle” in Gujarat to bring Pawar-Adani together!!
अहमदाबादच्या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये बारामतीच्या शेतकऱ्याने एक छोटा कारखाना काढला आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्याने गौतम अदानींना अध्यक्ष, तर शरद पवारांना उद्घाटक म्हणून बोलविले. ही माहिती स्वतः शरद पवारांनीच पत्रकार परिषदेत दिली.
गायीच्या दुधाच्या चिकापासून एक प्रॉडक्ट बारामतीच्या शेतकऱ्याने तयार केले आहे. या प्रॉडक्टचा उपयोग माणसाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो. त्याचा कारखानाही त्या शेतकऱ्याने सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते त्या शेतकऱ्यांनी करवून घेतले आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गौतम अदानींना दिले. त्यामुळे आम्ही एकत्रित त्या कार्यक्रमात होतो, अशी माहिती पवारांनी दिली.
गौतम अदानींच्या विविध व्यवसाय विस्तार या मुद्द्यावरून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खुद्द गौतम अदानी यांना टार्गेट करत असतात. अदानींच्या शेअर व्यवहाराची जेपीसी मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. पण पवार मात्र त्या मागणीच्या विरोधात आहेत. या मुद्द्यावरून भाजपने राहुल गांधींना कालच छेडून घेतले. गौतम अदानींना शरद पवार नेहमी भेटतात. त्यावर शरद पवारांना राहुल गांधी प्रश्न विचारू शकतील का??, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी केला. या सवालाला काँग्रेसने अद्याप उत्तर दिलेले नाही.
पण आज शरद पवारांनी स्वतःच अदानी भेटीवर स्पष्टीकरण दिले. कोणताही शेतकरी काही अभिनव उपक्रम राबवत असेल आणि त्या शेतकऱ्याने आपल्याला उपक्रमासाठी बोलावले, तर आपण कुठेही जाऊ शकतो, असे शरद पवार म्हणाले. यातून पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसची कोंडी केली. पण या सगळ्या प्रकारात पवार आणि अदानी यांना एकत्र आणण्यात बारामतीच्या त्या शेतकऱ्याची चतुराई दिसली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App