‘काँग्रेसने छत्तीसगडच्या जनतेची केली फसवणूक, केंद्राच्या योजना बंद पाडल्या’, भाजपाचा राज्य सरकारवर हल्लाबोल!


काँग्रेस सरकार नक्षलवाद्यांच्या बरोबरीने पाऊल टाकत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

विशेष प्रतिनिधी

सांबवी : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी  पत्रकार परिषदेत छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ”काँग्रेस नक्षलवाद्यांसोबत एकत्र काम करत आहे. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या योजना बंद पाडल्या. काँग्रेस सरकारने छत्तीसगडच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.” Congress cheated the people of Chhattisgarh BJP attacked the state government

पत्रकार परिषदेत भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ”काल राहुल गांधी छत्तीसगडमध्ये होते. यावेळी त्यांनी जनतेला अनेक खोटी आश्वासने दिली. आता वेळ आली आहे की देशातील आणि छत्तीसगडच्या जनतेने राहुल गांधी आणि काँग्रेसला आरसा दाखवावा. छत्तीसगडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यात ३१६ आश्वासने दिली होती, जी राहुल गांधी आणि छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने अद्याप पूर्ण केलेली नाहीत.”

पात्रा यांनी छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारवर केंद्र सरकारच्या योजना बंद केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, छत्तीसगडमधील लाखो शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकलेला नाही. छत्तीसगडमध्ये चरण पादुका आणि साडी वाटप योजना आमच्या सरकारच्या काळात सुरू होती, पण ती योजना बंद पडली. आम्हाला विचारायचे आहे की हे का केले गेले?

3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार मैदानात उतरविले; याला म्हणतात खऱ्या भाकऱ्या फिरवणे!!

इतकंच नाही तर काँग्रेस सरकार नक्षलवाद्यांच्या बरोबरीने पाऊल टाकत चालत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचे काम मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत केले आहे, त्याची आकडेवारी गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद आणि संसदेत उघड केली. पण खेदाने म्हणावे लागेल की आरोपपत्रात तथ्य आहे की छत्तीसगड सरकारने नक्षलवाद्यांना प्रोत्साहन दिले आणि नक्षलवाद्यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली.

Congress cheated the people of Chhattisgarh BJP attacked the state government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात