70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी; सुप्रिया वैफल्यग्रस्त, सुनील तटकरेंची तिखट टीका

प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार शरद पवारांपासून दूर जाऊन महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लोकसभेत केली त्यावरून सुप्रिया सुळे नैराश्यात आणि वैफल्यग्रस्त आहेत, अशी टीका अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. Supriya Sule’s demand for an inquiry into the 70000 crore scam

अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या स्वतंत्र निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांना आलेले नैराश्य अद्याप दूर झाल्याचे दिसत नाही, असे तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी संसदेत सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची खुली चौकशी करण्याचे आव्हान दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात एनसीपीचा उल्लेख नॅचरल करप्ट पार्टी असा केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर सिंचन आणि बँक घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यांची चौकशी करावी, असे त्या म्हणाल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांना जबर धक्का

सु्प्रिया सुळे यांच्या चौकशीच्या मागणीमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे. तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या स्वतंत्र निर्णयाचा सुप्रिया सुळे यांना जबर धक्का बसला. त्या नैराश्यात गेल्या. त्यांचे नैराश्य अजून दूर झाल्याचे दिसत नाही.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे निर्णयही आलेत. सध्या त्या वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी विधाने करत आहेत. त्यांना हे विधान टाळता आले असते, असे तटकरे म्हणाले.

अजित पवारांच्या पाठिशी अवघा महाराष्ट्र

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवघा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला दिवसागणिक पाठिंबा वाढत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

संसदेत माझे 1 नव्हे 800 भाऊ

दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याची मागणी केली तेव्हा सत्ताधारी बाकावरून कुणीतरी अजित पवार यांचे नाव घेतले. त्यावर त्या म्हणाल्या की, ही नात्याची गोष्ट नाही. संसदेत माझे 1 नव्हे, तर तब्बल 800 भाऊ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी दुःख आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त भारत हवा आहे. यासाठी आमची त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहण्याची तयारी आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Supriya Sule’s demand for an inquiry into the 70000 crore scam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात