“इंडिया” आघाडीतली इनसाईड स्टोरी, तुरुंगात जायची ठेवा तयारी; पण हा मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा की खात्री??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीतल्या बैठकीची इनसाईड स्टोरी बाहेर आली आहे. त्यात म्हणे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आघाडीतल्या नेत्यांना तुरुंगात जायचे तयारी ठेवा, असे म्हटल्याचे माध्यमांनी बातम्यांमधून सांगितले आहे. पण हा मल्लिकार्जुन खर्गे यांचा नेत्यांना दिलेला इशारा आहे की आपल्या नेत्यांच्या गुन्हेगारी कर्तृत्वाची “खात्री” आहे??, हा कळीचा सवाल तयार झाला आहे. Inside Story of “India” Front, Ready to Go to Jail; But is this Mallikarjun Kharge’s warning or sure??

कारण ईडी, सीबीआय अथवा एनआयए या केंद्रीय तपास संस्थांनी कुठलीही कायदेशीर कारवाई केली की त्याला राजकीय रंग देण्याची गेल्या दोन-तीन वर्षांतली सगळ्या विरोधकांची सवय आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा समावेश आहे. हे नेते नेहमी कोणत्याही कारवाईला राजकीय रंगच देतात.

या पार्श्वभूमीवर”इंडिया” आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण करताना सर्व नेत्यांना पुढचा काळ कठीण आहे. ईडी, सीबीआय आपल्यावर कारवाई करू शकतात. त्यामुळे तुरुंगात जायची तयारी ठेवा. सावध रहा, असा इशारा दिला.



गेली दोन-तीन वर्षे असा इशारा सगळेच नेते देत असताना भ्रष्टाचार अथवा गुन्हेगारी यांच्यावरची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही. ईडी, सीबीआय यांनी कोणावरचेही गुन्हे आणि खटले मागे घेतलेले नाहीत. विरोधकांच्या राजकीय टीकेला आपण भीक घालत नाही हेच केंद्रातल्या मोदी सरकारने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या इशाऱ्याकडे पाहिल्यावर एक सवाल तयार होतो, की हा खर्गे यांचा फक्त इशारा आहे, की आपल्या आघाडीत असे अनेक नेते आहेत की जे ईडी किंवा सीबीआयच्या तावडीत सापडून तुरुंगात जाऊ शकतात याची मल्लिकार्जुन खर्गेंना खात्री आहे?? कारण त्यांच्या आतापर्यंतच्या कारवाया तशा आहेत. त्यामुळेच खर्गे यांनी दिलेला इशारा हा खात्रीत रूपांतरित झाला आहे.

तसेही “इंडिया” आघाडीतल्या जवळजवळ प्रत्येक पक्षाच्या प्रमुखावर अथवा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर चारा घोटाळ्यापासून टूजी घोटाळा, कोळसा घोटाळ्यापर्यंत सगळे आरोप आहेत. यातून लालूप्रसाद यादव यांच्यापासून ते ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत कोणीही सुटलेले नाही. खुद्द सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे नॅशनल हेरल्ड केस मध्ये जामीनावर आहेत. शरद पवारांचे नाव राज्य सहकारी शिखर बँकेच्या घोटाळ्यात आहे. हे सगळे घोटाळे आणि त्यांच्यावरचे खटले अजूनही “लाईव्ह वायर” आहेत.

त्यामुळे येत्या सहा – आठ महिन्यांत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहेच. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांना तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, हा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात त्यांना ती खात्रीच दिसते आहे!!

Inside Story of “India” Front, Ready to Go to Jail; But is this Mallikarjun Kharge’s warning or sure??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात