ताई – दादांचं भांडण बारामती साठी ठेवायचं झाकून; पण इतरांमध्ये लावून द्यायचं ठासून!!, अशी पावसात भिजल्यानंतरची रणनीती काकांनी आखल्याचे दिसून येत आहे. Sharad pawar trying to cover up differences between ajit pawar and supriya sule for baramati, but second rank leaders are fighting with each other
2019 मध्ये ते पावसात भिजले जरी 54 आमदारच निवडून आले. पण त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अस्वस्थतेचा लाभ घेत महाराष्ट्रात सत्तेचे परिवर्तन घडवून आणले. त्याचे क्रेडिट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि काकानिष्ठ माध्यमांनी पावसाला दिले.
पण आता 2024 साठी काकांनी स्वतंत्र रणनीती आखली आहे आणि तीच रणनीती म्हणजे ताई – दादांचं भांडण ठेवायचं बारामतीसाठी झाकून आणि इतरांमध्ये लावून द्यायचं ठासून!!, ही ती रणनीती आहे.
या रणनीतीतूनच शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आता एकमेकांचे राजकीय ओरबडे काढायला सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ हे त्यातले आघाडीचे तोपची आहेत. आमदार रोहित पवार हे शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेससाठी “संजय राऊत” यांचे काम करत आहेत. त्यामुळे माध्यमांच्या दिवसभरातल्या बातम्यांमध्ये पवार फॅक्टर चर्चेत राहत आहे.
छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत जुने तेलगी प्रकरण काढून पवारांच्या राजकारणाचे सगळे वाभाडे काढले. त्यावेळी सभेत उपस्थित असलेल्या काही लोकांनी जोरदार आवाज काढले. त्या आवाजाचे अर्थ शरदनिष्ठ राष्ट्रवादी या नेत्यांनी स्वतःला अनुकूल असे काढले, पण जे व्हायचे ते झालेच!! या निमित्ताने तेलगी प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले. तेलगी नार्को टेस्ट मध्ये जे बोलला होता, त्याचा शोध पुन्हा घेतला पाहिजे, अशी मागणी समोर आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने शरद पवारांची अडचण झाली आणि मग शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांचा पुतळा अजितनिष्ठ कार्यकर्त्यांनी जाळला.
अजितदादांचे अख्खे भाषण माध्यमांनी दाखविले, पण त्यांनी शरद पवारांना बारामतीतून “डी ब्रँड” केले, हे नाही सांगितले!!
वास्तविक बीडच्या सभेआधी कोल्हापूरच्या सभेच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांची पायताण विरुद्ध कापशी चप्पल अशी लढाई रंगली, तरी एकमेकांची पोस्टर जाळण्यापर्यंत मजल गेली नाही. पण भुजबळांनी तेलगी प्रकरण बाहेर काढले आणि त्यांचे पोस्टर शरदनिष्ठ कार्यकर्त्यांनी जाळले यातूनच राष्ट्रवादीतले खरे बिंग फुटले.
आत्तापर्यंत पवार इतरांची घरे फोडतात असा आरोप व्हायचा. त्याला मुंडे, क्षीरसागर आदी घराण्यांची उदाहरणे दिली जायची. पण आता हीच वेळ स्वतःच्या घरावर आल्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत चलाखीने ताई – दादांचे भांडण बारामतीसाठी झाकून ठेवले. बारामती ते अजितदादांना “आपले” म्हणाले पण साताऱ्यात जाऊन लगेच पलटले. यातून घ्यायचा तो संदेश दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्यातूनच जितेंद्र आव्हाड विरुद्ध हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड विरुद्ध छगन भुजबळ अशी लढाई रंगली.
पण आत्ता तरी हे दुसऱ्याच नेते फळीतले नेते झुंजत आहेत. अजून ही झुंज लावणारे खरे नेते बोलायचे आहेत. त्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस तळापासून ढवळून काढणारे “चाणक्य” तर अजून इशाऱ्यात देखील बोलायचे आहेत. शरद पवारांचे निष्ठावंत दोन नंबरचे नेते प्रफुल्ल पटेल अजून पुस्तक लिहायचे आहेत. अजून बरेच काही बाकी आहे.
सध्या मात्र ताई – दादांचे भांडण ठेवायचे झाकून आणि इतरांची भांडणे लावायचे ठासून याचा काका प्रयोग सुरू आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App