ठाकरे – शिंदे, पवार काका – पुतण्याची मराठवाड्याच्या रणभूमीत आपापसांत झुंज; मोदी मात्र मन की बात, b20 मध्ये दंग!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – शिंदे, पवार काका – पुतण्याची मराठवाड्याच्या रणभूमीत आपापसांत झुंज, पंतप्रधान मोदी मात्र मन की बात आणि b20 मध्ये दंग!!, असे आज दिवसभरातले राजकीय चित्र होते. Shivsena and NCP fighting among themselves, BJP leaders left it with them and turn their own focus on other states

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणीत होते. तेथे त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देश चंद्रावर पोहोचला, पण काही लोक घरातच बसले. आम्ही त्यांना करंट दिला त्यामुळे आता ते जागे होऊन इतरत्र फिरायला लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.

उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा

उद्धव ठाकरे यांनी आज संतोष बांगर यांचा मतदारसंघ हिंगोलीत सभा घेतली. आपली सभा जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना हाणला. मला भाजपच्या कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती वाटते. कारण भाजपमध्ये आता सगळ्या आयारामांची चलती आहे. त्यांना पदे दिली जात आहेत आणि भाजपचे मूळ निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा सतरंज्या उचलायला ठेवले आहेत, असे शरसंधान उद्धव ठाकरेंनी भाजपवर साधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते टरबूज म्हणाले. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी मोदी – शाहांचा भाजप देशभरात दंगली घडवून आणेल, असा आरोप त्यांनी केला. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा सगळा रोख एकनाथ शिंदे यांच्या गटावरच राहिला. याचा अर्थ मराठवाड्याच्या रणभूमीत आज ठाकरे विरुद्ध शिंदे ही शिवसेनेतली आपापसातलीच लढत रंगली होती.

 काका – पुतण्यांची मराठवाड्यात झुंज

जे ठाकरे आणि शिंदे यांचे, तेच पवार काका – पुतण्यांचे. शरद पवारांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार आज सभा घेत आहेत. तत्पूर्वी त्यांनी परभणीच्या शासन माझ्या दारी कार्यक्रमात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकासाच्या कामात साथ देण्यासाठी आलो असल्याचा निर्वाळा पुन्हा एकदा दिला आणि ते बीडच्या सभेसाठी रवाना झाले. शरद पवारांनी बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात सभा घेतली होती. त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार बीडला पोहोचले. तेथे देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती करत त्यांच्याच नेतृत्वाखाली भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होईल, अशी ग्वाही दिली.

काल बारामतीच्या सभेत त्यांनी शरद पवारांचे नावही घेतले नव्हते. 54 वर्षांची कारकीर्द असलेल्या शरद पवारांच्या बारामतीत त्यांचे नावही त्यांच्या पुतण्याने घेतले नाही याची चर्चा जोरदार रंगली. पण आज मराठवाड्याच्या रणभूमीवर राष्ट्रवादीतलेच काका – पुतणे आपापसांत झुंजताना दिसले.

 मोदींचे दोन कार्यक्रम

या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात आणि b20 कार्यक्रमांमध्ये रंगलेले दिसले. मन की बात मध्ये त्यांनी चांद्रयानाच्या यशस्वीतेबद्दल पुन्हा एकदा वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. नेहमीप्रमाणे वेगवेगळे विषय सांगितले. त्यात राजकीय विषयांना स्पर्श केला नाही, तर b20 च्या कार्यक्रमात त्यांनी क्रिप्टो करन्सी संदर्भात सावधपणे पाऊले टाकण्याचे आवाहन केले. याही कार्यक्रमात त्यांनी स्थानिक राजकारणावर कोणतीही चर्चा केली नाही.

त्या उलट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तेलंगणात आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उत्तराखंडमध्ये जाहीर सभा झाल्या. तेथे अर्थातच त्यांनी जोरदार राजकीय भाषणे केली.

पण महाराष्ट्रातले राजकीय चित्र मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्येच आपापसातली झुंज आता जोर पकडत असल्याचे दिसू लागले आहे!! ही झुंज लावून भाजपचे नेतृत्वाचा इतर विषयांकडे वळले आहे.

Shivsena and NCP fighting among themselves, BJP leaders left it with them and turn their own focus on other states

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात