विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय इस्त्रो या संस्थेच्या चांद्रयान तीन या मोहिमेचं जगभरातून कौतुक होतंय.नासा या संस्थेकडून देखील चांद्रभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या चौथा देश ठरल्याबद्दल भारताचा विशेष अभिनंदन करण्यात आलं. नासाचे संचालक बिल्स नेल्सन यांनी बुधवारी भारताचे अभिनंदन केलं. Google tribute to Chandrayan 3 landing two special Doodle.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यशस्वीपणे लँडिंग बद्दल भारताचे आणि शास्त्रज्ञांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुक केलं. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं.
चांद्रयान तिच्या या यशाबद्दल जगाभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता गुगलने देखील या मोहिमेचं विशेष कौतुक केलं आहे. चंद्रयान-३ मोहिम यशस्वी ठरल्याबद्दल खास गुगल डूडल तयार केलं आहे.चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा टप्पा काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला.
भारतासाठी हा क्षण अत्यंत गर्वाचा होता. भारताची मान संपूर्ण जगभरात यावेळी गर्वाने उंचावली. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शास्त्रज्ञांची दिवसरात्र केलेली मेहनत होती. तर हा क्षण यशस्वीपडे पार पडताना बघण्यासाठी काल संपूर्ण भारतीयांचे लक्ष स्क्रिनवर या क्षण बघण्याकडे लागलेले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App