आयफोनसाठी घरातच केलेली १ लाखांची चोरी उघडकीस आली अन त्याने भीतीने आत्महत्या केली!

  • मोबाईल खरेदी करताच वडिलांच्या भीतीने मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
  • कल्याण शहरातील हादरून टाकणारी घटना

विशेष प्रतिनिधी

मुबंई : मोबाईल हा सध्याच्या पिढीसाठी स्टेटस सिम्बॉल बनलाय. आपल्या जवळ जेवढा जास्त किमतीचा मोबाईल तेवढा आपला सामाजिक दर्जा मोठा असा एक चुकीचा समज तरुण पिढीमध्ये पाहायला मिळतोयं. तो मोबाईल मिळावा या हट्टा साठी नको ते कृत्य या तरुण पिढीच्या हातून घडतात. अशीच एक हदरून टाकणारी घटना कल्याण शहरात घडली आहे. Childed for stealing Rs 1 lakh to buy iPhone, boy kills self

राजवर्धन यादव वय वर्ष 17 या तरुणाला स्वतःसाठी आयफोन खरेदी करायचा होता. राजवर्धन च मूळचं कुटुंब हे उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथलं. राजवर्धन नुकताच बारावी पास झाला होता. त्याला स्वतःसाठी महागडा आयफोन खरेदी करायचा होता. त्यासाठी राजवर्धनं घरातून कोणालाही न सांगता एक लाख रुपये घेतले आणि मुंबई मीरा-भाईंदर इथं तो आपल्या काकाच्या घरी आला. मुंबईत आल्यावर त्याने त्या पैशाने आयफोन खरेदी केला.

इकडे वडिलाने घरातून पैसे गायब झाल्यामुळे राजवर्धन कडे पैशाची चौकशी केली. पैसे गायब झाल्याचं आता वडिलांना कळलं आहे . आणि कोणालाही न कळवता ते पैसे तर आपण घेतले आहेत. या भीतीने राजवर्धन घाबरला. आणि या भीतीपोटी त्याने कल्याण शहर गाठलं आणि रात्रीच्या सुमारास पत्रीपुल परिसरात रेल्वे रुळालगत असलेल्या तिथल्या झाडाला लटकून घेतं आत्महत्या केली.

राजवर्धनचा मृतदेह महात्मा फुले ठाण्याच्या हद्दीत सापडला. या तरुणाने आत्महत्या का केली असेल. यासाठी पोलीस तपास करत असताना. पोलिस तपासात हे कारण समोर आलं.

Childed for stealing Rs 1 lakh to buy iPhone, boy kills self

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात