राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातली मजार हटविल्यानंतरही तेथे संशयास्पद हालचाली!!

प्रतिनिधी

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे जाहीर सभेत माहीमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्यात आली असल्याचे सांगत त्याचे व्हिडिओही दाखवले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेथून मजार हटवण्यात आली. या कारवाईला काही दिवस नाही होत तोच पुन्हा एकदा या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली वाढल्या आहेत. तिथे काही लोकांची ये-जा सुरू झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवली आहे.Gulham navi azad targets rahul Gandhi and other Congress leaders again before his autobiography is out



त्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी मुसलमानांनी अनधिकृत बांधकाम करू नये, यासाठी यंत्रणांना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, असे दिसते.

 

माहीमच्या समुद्र किनाऱ्यालगत एक छोटा भूभाग आहे. त्या ठिकाणी मुसलमान अनेक वर्षांपासून ये-जा करत होते, मात्र मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी चक्क मजार बांधण्यात आली होती, तिकडे मुसलमान नियमित जाऊ लागले होते. त्यावर राज ठाकरे यांनी या ठिकाणी दुसरी हाजी अली उभारण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या त्या भाषणानंतर यंत्रणांनी तात्काळ त्याची दखल घेत ती मजार हटवली. मात्र या कारवाईनंतर काही दिवस उलटत नाही तोच त्या ठिकाणी मुसलमानांची पुन्हा ये-जा सुरु झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने मुसलमान अनधिकृत बांधकाम बांधणार नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि सतर्कता बाळगावी, अशी मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे.

Gulham navi azad targets rahul Gandhi and other Congress leaders again before his autobiography is out

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात