दोन महिन्यानंतर घटना उघडकीस; छत्तीसगडमधील उसालपूर येथील प्रकार
प्रतिनिधी
छत्तीसगडमधील उसालपूर येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरूणाने चारित्र्यावरील संशयावरून पत्नीची निघृण हत्या केली. एवढ्यावरच हा तरूण थांबला नाही तर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे घराच्या छतावरील पाण्याच्या टीकीत एक मोठ्या प्लॉस्टिकमध्ये गुंडाळून लपवले होते. दोन महिन्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. A man Pavan Thakur detained for allegedly killing his wife chopping her off into pieces and dumping them in a water tank in his house in Uslapur
”…त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे पत्र लिहून यातून कोणाची सुटका होईल’’ विरोधकांनी मोदींना पाठवलेल्या पत्रावर फडणवीसांचं विधान!
शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर सगळा प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पवनसिंह ठाकूर असे आरोपीचे नाव असून, पूलाखाली त्याचे घर आहे. मुंगेली येथील दाऊपारा येथील रहिवासी असलेल्या सती साहू हिच्याशी त्याचा विवाह झाला होता.
Chhattisgarh | A man, Pavan Thakur detained for allegedly killing his wife Sati Sahu, chopping her off into pieces & dumping them in a water tank in his house in Uslapur, Bilaspur on suspicions of infidelity. Body recovered, Police say it may have been dumped 1-2 months ago. pic.twitter.com/Phb7cERD8Z — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 6, 2023
Chhattisgarh | A man, Pavan Thakur detained for allegedly killing his wife Sati Sahu, chopping her off into pieces & dumping them in a water tank in his house in Uslapur, Bilaspur on suspicions of infidelity. Body recovered, Police say it may have been dumped 1-2 months ago. pic.twitter.com/Phb7cERD8Z
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 6, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनसिंह याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. जवळपास दोन महिन्यांपूर्वी यावरून त्याचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते आणि यातूनच त्याने धारधार शस्त्राने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे छोटे तुकडे केले आणि ते मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्यावर टेप चिकटवला आणि छतावरील कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत लपवले होते. जेणेकरून दुर्गंधी येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App