वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टाचे नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयू कक्षात हलवण्यात आले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे मुलायम सिंह यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 26 सप्टेंबरपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. Mulayam Singh Yadav’s condition critical: Admitted to ICU in Medanta Hospital, low oxygen level
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव पत्नी डिंपल आणि मुलगा अर्जुनसोबत मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. शिवपाल सिंह यादव हे देखील रुग्णालयात आहेत. अपर्णा यादव दिल्लीत पोहोचल्या आहेत. मुलायम सिंह यांचे निकटवर्तीय आणि संपूर्ण कुटुंब इटावा येथील गृह जिल्ह्यातील सैफई गावातून दिल्लीत पोहोचले आहे.
समाजवादी पक्षात मुलायमसिंह विरुध्द अखिलेश गटबाजी, अनेक जुने नेते पक्ष सोडणार
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलायम सिंह यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजन आधीच कमी होता. मेदांता हॉस्पिटल मॅनेजमेंट त्यांच्या प्रकृतीबाबत सायंकाळी साडेसात वाजता मेडिकल बुलेटिन जारी करेल. मुलायम 82 वर्षांचे आहेत.
मुलायमसिंह यादव यांची काळजी घेण्यासाठी यूपीतील विविध जिल्ह्यातील सपाचे नेते दिल्लीला जात आहेत. एमएलसी रणविजय सिंह, अंबिका चौधरी, नारद राय आणि माजी मंत्री अरविंद सिंह गोप लखनऊहून निघाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App