वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजस्थान मधला नेतृत्व पेचप्रसंग एपिसोड नंबर एक पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनी मध्यरात्री राजकीय खलबते झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही बऱ्याच दिवसांनी सामील झालेल्या दिसल्या. काँग्रेस केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये सत्तेवर असताना अशी रात्रीची खलबते चालायची. पण त्यालाही आता सात – आठ वर्षे उलटून गेली आहेत.Delhi: Congress interim president Sonia Gandhi leaves from the residence of the party’s general secretary and her daughter, Priyanka Gandhi Vadra.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबरोबरच राजस्थान मधला नेतृत्वाचा पैसा प्रसंग एपिसोड क्रमांक एक सलग दोन दिवस घडल्यानंतर काल खलबतांचा केंद्रबिंदू राजधानी दिल्ली राहिला. त्यातही मध्यरात्री काँग्रेसचे नेते एकमेकांकडे जाऊन चर्चा करत राहिले होते. यामध्ये दस्तूर खुद्द सोनिया गांधी सामील झाल्या होत्या. सचिन पायलट रात्री साडेनऊ नंतर 10 जनपथ वर भेटून गेल्यानंतर सोनिया गांधी 10 जनपथ मधून बाहेर पडले आणि त्यांनी प्रियांका गांधी यांच्या घरी जाऊन रात्री 12.00 वाजेपर्यंत चर्चा केली. त्यानंतर तेथून त्या बाहेर पडल्या.
दरम्यानच्या काळात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना काल मध्यरात्रीपर्यंत जी 23 गटाचे नेते एकमेकांना भेटत होते. आनंद शर्मा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग होडा आणि खासदार मनीष तिवारी यांनी चर्चा केली. त्यानंतर आनंद शर्मा हे जयपूर हाऊस मध्ये पोहोचले. तेथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उतरले आहेत. तेथे जाऊन आनंद शर्मा यांनी मध्यरात्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. कदाचित अशोक गहलोत आता जी 23 गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.
#WATCH | Delhi: Congress interim president Sonia Gandhi leaves from the residence of the party's general secretary and her daughter, Priyanka Gandhi Vadra. pic.twitter.com/y66ToYSLLo — ANI (@ANI) September 29, 2022
#WATCH | Delhi: Congress interim president Sonia Gandhi leaves from the residence of the party's general secretary and her daughter, Priyanka Gandhi Vadra. pic.twitter.com/y66ToYSLLo
— ANI (@ANI) September 29, 2022
अशोक गहलोत जी 23 गटाचे उमेदवार??
राजस्थानात नेतृत्वाच्या पेचप्रसंगात अशोक गहलोत यांचा गट थेट काँग्रेस हायकमांडला आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावर खुलासा करण्यासाठी अशोक गहलो त्यांनी सायंकाळीच सोनिया गांधी यांची भेट घेऊन माफी देखील मागितली होती. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती. पण या माघारी नंतर आनंद शर्मा यांनी जी 23 गटाच्या वतीने जाऊन अशोक गहलोत यांची भेट घेणे याला विशेष राजकीय महत्त्व आहे. त्यामुळेच ते काँग्रेसचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निष्ठावंत उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन जी 23 गटाचे उमेदवार होतात का??, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
बऱ्याच दिवसांनी काँग्रेसमध्ये घडलेल्या मध्यरात्रीच्या खलबतांचा हा पॉलिटिकल एंड तर नसेल??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App