इतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार!!


विशेष प्रतिनिधी

सन 2022 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो, पण उडी गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार!!, ही इतिहासाची साक्ष आहे. काँग्रेसचा स्थापनेपासूनचा इतिहास बघायला नको, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा म्हणजे 1947 पासूनचा इतिहास पाहिला तरी काँग्रेस अध्यक्षांच्या नेहरू गांधी परिवार निष्ठेची साक्ष पटते. जेव्हा एखाद्या काँग्रेस अध्यक्षाने नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या पलिकडे जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस एकतर फुटली तरी आहे किंवा संबंधित अध्यक्षाला बाजूला तरी केले गेले आहे, असे इतिहास सांगतो.Whom so ever Congress president, will be a follower of Nehru Gandhi Dynasty

1947 ते 2022 पर्यंत नेहरू गांधी परिवाराने 41 वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर बाकीची वर्षे नेहरू गांधी परिवारनिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद संभाळले आहे. निजलिंगप्पा आणि नीलम संजीव रेड्डी हे दोनच काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या पलीकडे जाऊन काही करू इच्छित होते, तेव्हा काँग्रेस फुटली आहे, तर सीताराम केसरी यांना ते नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कसोटीवर न उतरल्यामुळे अपमानास्पदरीत्या काँग्रेस अध्यक्षपदावरून घालविण्यात आले आहे, अशी इतिहासाची साक्ष आहे!!बाकीच्या काँग्रेस अध्यक्षांमध्ये उच्छंगराय ढेबर, शंकर दयाळ शर्मा, देवकांत बरुआ, बाबू जगजीवन राम हे नेहरू गांधी परिवारनिष्ठ अध्यक्ष होते. त्यांनी परिवार निष्ठेच्या पलिकडे जाऊन कोणतीही बंडखोरी अध्यक्षपदावरून तरी केलेली दिसत नाही. 1969 मध्ये काँग्रेस अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकारणी सदस्यांचा पाठिंबा मिळवून नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वा काँग्रेस फुटली होती आणि त्याच काँग्रेसने केंद्रातली सत्ता टिकवून बंडखोर उमेदवार वराहगिरी व्यंकटगिरी यांना राष्ट्रपती पदावर निवडून आणले होते. निजलिंगप्पा आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली संघटना काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली जाऊन अखेरीस जनता पक्षात विलीन करावी लागली होती. पण हा झाला गेल्या शतकातला उत्तरार्धामधला इतिहास.

1990 च्या दशकात राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर सुमारे 10 वर्षे पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले होते. यातली नरसिंह राव यांची काँग्रेस अध्यक्षपदाची वर्षे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातली होती. सोनिया गांधी त्यावेळेला तितक्या राजकीय दृष्ट्या ॲक्टिव्ह नव्हत्या. त्यामुळे नरसिंहराव यांना नेहरू गांधी परिवारनिष्ठ काँग्रेस अध्यक्ष असे लेबल लागले नव्हते. पण 1996 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नरसिंह विरोधी गटाने उचल खाऊन सीताराम केसरी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले आणि त्यांनी नरसिंह रावांना अलगद बाजूला काढले. खुद्द सीताराम केसरी यांनी काँग्रेस संघटनेवरची आपली पकड मजबूत ठेवली होती. त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवून शरद पवार आणि राजेश पायलट या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा दारुण पराभव देखील केला होता. पण त्यांचा प्रभाव तोपर्यंतच टिकला, जोपर्यंत सोनिया गांधी खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह नव्हत्या. सोनिया गांधी ऍक्टिव्ह झाल्यानंतर मात्र सीताराम केसरी यांना अक्षरशः अपमानास्पद रित्या बाजूला केले गेले.

जेव्हा आता सन 2022 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे, तेव्हा गांधी परिवाराने निवडणूक लढवायला नकार दिल्यामुळे सध्या तरी नेहरू गांधी परिवारनिष्ठ उमेदवारच मैदानात असल्याचे दिसत आहेत. दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्यात लढत होणे अपेक्षित आहे. शशी थरूर यांनी लढती पूर्वीच ही मैत्रीपूर्ण लढत असेल आणि जो कोणी जिंकेल, त्यापेक्षा काँग्रेस पक्ष विजयी होईल, असे आधीच जाहीर करून टाकले आहे. या दोन्हीही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी सोनिया गांधी यांची परवानगी घेतली आहे. राजस्थान मधल्या राजकीय एपिसोड नंतर अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची माफी मागून राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडलेले नाही, तर त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

त्यामुळे जी काही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे ती बहुतेक दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्यातच होणे अपेक्षित आहे. कोणी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर आणि तरच नेहरू गांधी परिवारनिष्ठ वर्तुळाच्या बाहेरचे एखादे नेते निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतील. पण ते निवडून येतीलच याची खात्री नाही. त्यामुळे अर्थातच काँग्रेस अध्यक्षपदाची जी काही निवडणूक होईल आणि जे कोणी नेते निवडून येतील, ते नेहरू गांधी परिवार निष्ठच असतील, यात शंका नाही. याचा अर्थच काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणीही निवडून येऊ देत… संबंधित नेत्याची उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडलेली असेल!! हीच इतिहासाची साक्ष पुन्हा मिळेल!!

Whom so ever Congress president, will be a follower of Nehru Gandhi Dynasty

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय