PFI ची बँक खाती सील, संघटनेवर बंदी, पण केरळात बस तोडफोडीची वसूल करणार 5.20 कोटी भरपाई!


वृत्तसंस्था

तिरूअनंतपूरम : देशात भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पण ही बंदी लादण्याच्या आधी देशभरात PFI च्या विविध अड्ड्यांवर वर राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि ईडीने छापे घातले होते. त्याच्या निषेधार्थ केरळमध्ये PFI च्या म्होरक्यांनी जी निदर्शने केली होती त्यामध्ये अनेक ठिकाणी बस गाड्यांची तोडफोड केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. त्याची भरपाई आता PFI च्या पदाधिकाऱ्यांकडूनच वसूल केली जाणार आहे. Kerala HC directed the PFI’s Gen Secy to deposit Rs 5.20Cr towards the damages estimated

केरळ हायकोर्टाने पीएफआय चा राज्य सचिव अब्दुल सत्तार याला येत्या दोन आठवड्यात 5.20 कोटी रुपये डिपॉझिट करायला सांगितले आहेत. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आधीच संघटनेची सर्व बँक खाती एनआयए आणि अन्य तपास संस्थांनी सील केली आहेत. केरळ राज्य सरकारने देखील बंदीची अंमलबजावणी केली आहे. ही अंमलबजावणी केल्यानंतर आज हायकोर्टाने PFI च्या राज्य सचिवाला येत्या दोन आठवड्यात नुकसान भरपाई म्हणून 5.20 रुपये डिपॉझिट भरायला सांगितले आहे.



पीएफवाय वरील छाप्यांच्या निषेधार्थ संघटनेच्या म्होरक्यांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी केरळमध्ये विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शने केली होती. अनेक शहरांमध्ये राज्य सरकार परिवहनात खात्याच्या बस गाड्या फोडल्या होत्या. अनेक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले होते. 5.20 कोटी रुपये ही त्याचीच नुकसान भरपाई भरायला केरळ हायकोर्टाने PFI चा राज्यसचिव अब्दुल सत्तार ला सांगितले आहे. त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. पीएफआय ची अधिकृत बँक खाती सील केल्यानंतर अब्दुल सत्तार हे 5.20 कोटी रुपये कुठून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हाच तो पीएफआय चा केरळ राज्य सचिव अब्दुल सत्तार आहे, ज्याने 28 सप्टेंबर 2022 रोजी ट्विट करून आपण या महान देशाचे कायदे पाळणारे नागरिक आहोत. त्यामुळे पीएफआय आपल्यावरची बंदी स्वीकारते आहे, असे जाहीर करणारे ट्विट केले होते. आता हाच अब्दुल सत्तार 5.20 कोटी रुपये आणणार कुठून हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Kerala HC directed the PFI’s Gen Secy to deposit Rs 5.20Cr towards the damages estimated

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात