दिल्लीतील मद्य धोरणात घोटाळे झाल्याच्या बातम्यांवरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी मद्य धोरणावरून केजरीवाल यांना चांगलेच फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे मद्य धोरण केले, लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे.Anna Hazare reprimanded Kejriwal on the liquor policy Said- Difference between your words and actions!
अण्णांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, टीम अण्णाच्या सदस्यांची 10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी आपने राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते, हे तुम्ही विसरलात. त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णांबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचे काम करणे गरजेचे आहे, असे मला त्यावेळी वाटले. या दिशेने काम झाले असते, तर मद्याबाबत असे चुकीचे धोरण कुठेही केले नसते.
AAP इतर पक्षांप्रमाणेच : अण्णा
अण्णा हजारे म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यानंतर तुम्ही, मनीष सिसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला हा पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.
‘तुम्ही मोठमोठी भाषणे दिली’
अण्णा म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी जे ऐतिहासिक आणि लोकायुक्त आंदोलन झाले, त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिलीत. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेबद्दल विचार मांडले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे मद्य धोरण तयार केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App