अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत : तब्बल 11 लाख कोटींची एकूण संपत्ती, फक्त मस्क-बेझोस पुढे


वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी 137.4 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 11 लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्टला मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या टॉप थ्रीमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.Adani Now World’s 3rd Richest Net Worth of Rs 11 Lakh Crores, Only Musk-Bezos Ahead

आता ते रँकिंगमध्ये मस्क आणि बेझोस यांच्या मागे आहे. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क 251 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल, तर बेझोस 153 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. टॉप-10 यादीत अदानी हे एकमेव भारतीय आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी $91.9 अब्ज (7.3 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 11व्या क्रमांकावर आहेत.हे आहेत जगातील टॉप 10 श्रीमंत

1 एलन मस्क 251 बिलियन डॉलर
2 जेफ बेझोस 153 बिलियन डॉलर
3 गौतम अदानी 137 बिलियन डॉलर
4 बर्नार्ड अर्नाल्ट 136 बिलियन डॉलर
5 बिल गेट्स 117 बिलियन डॉलर
6 वॉरेन बफे 100 बिलियन डॉलर
7 लॅरी पेज 100 बिलियन डॉलर
8 सर्गेई ब्रिन 95.8 बिलियन डॉलर
9 स्टीव्ह बाल्मर 93.7 बिलियन डॉलर
10 लॅरी एलिशन 93.3 बिलियन डॉलर

गेल्या महिन्यात बिल गेट्सना टाकले होते मागे

गेल्या महिन्यात अदानी हे चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते. त्यांनी बिल गेट्सना मागे टाकले होते. केवळ 2022 मध्येच अदानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 60.9 बिलियनची भर घातली आहे. हे प्रमाण कोणत्याही उद्योगपतीपेक्षा 5 पट जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव कोरले होते.

एप्रिल 2021 मध्ये 57 अब्ज डॉलर होती अदानींची संपत्ती

अदानी 4 एप्रिल रोजी सेंटिबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटिबिलियनेर म्हणतात. एक वर्षापूर्वी एप्रिल 2021 मध्ये, अदानींची एकूण संपत्ती 57 अब्ज होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात अदानींची एकूण संपत्ती जगातील सर्वात वेगाने वाढली. अदानी समूहाच्या 7 सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कंपन्या आहेत.

Adani Now World’s 3rd Richest Net Worth of Rs 11 Lakh Crores, Only Musk-Bezos Ahead

महत्वाच्या बातम्या 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात