दिल्लीत नायब राज्यपालांच्या विरोधात आप आक्रमक : 1400 कोटींच्या जुन्या नोटा बदलल्याचा आपचा आरोप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत आप व भाजप यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आम आदमी पार्टीने नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आप आमदारांनी रात्रभर विधानसभा परिसरात धरणे धरले.AAP aggressive against Lt Governor in Delhi: AAP accuses him of changing old notes of 1400 crores

आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले, नोटबंदीदरम्यान विद्यमान उपराज्यपालांनी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना १४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी आपच्या आमदारांनी केली आहे. आरोप असल्यास चौकशी करावी, असे त्यांनी स्वत:च म्हटले होते. त्यामुळे आता आम्ही त्यांची सीबीआय, ईडीद्वारे चौकशीची मागणी करत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. आता आपचे शिष्टमंडळ नायब राज्यपालांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार देऊ शकते.



आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी सक्सेना यांच्यावर खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षपदावर असताना नोटबंदीदरम्यान १४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यासाठी पाठक यांनी खादी ग्रामोद्योगाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांच्या जबाबाचादेखील हवाला दिला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्यांच्या आदेशानुसार खादीतील जुन्या नोटांची अदलाबदली करून नवीन नोटा वापरण्यात आल्या. काळ्या पैशांना व्हाइट करण्यात आले.

AAP aggressive against Lt Governor in Delhi: AAP accuses him of changing old notes of 1400 crores

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात