वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जहांगीरपुरी मधील अतिक्रमण विरोधातील बुलडोजर कारवाई सुप्रीम कोर्टाने तात्पुरती थांबली असली तरी, तिथल्या दंगलीतील आरोपींना पकडण्याची कारवाई पोलिसांनी थांबवलेली नाही. CCTV identified 300 accused in Jahangirpuri riots from video footage
जहांगिरपुरी परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासून आणि वेगवेगळी व्हिडिओ फुटेज तसेच फोटो पाहून या दंगलीतील 300 आरोपींची ओळख पोलिसांनी पटवली असून त्यांच्या अटकेसाठी मोठी शोध मोहीम पोलीस राबवत आहेत.
आत्तापर्यंत जहांगीरपुरी दंगलीतील 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य आरोपी मोहम्मद अन्सा, अफजल आणि सोनू चिकणा यांना कोर्टाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोनू चिकणाने हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान हवेत गोळीबार केला होता. तर बाकीच्या तीनशे आरोपींनी मिरवणुकीवर दगडफेक केली होती. या आरोपींची ओळख पटवण्याचे काम गेले तीन-चार दिवस सुरू होते. पोलिसांनी जहांगीरपुरी परिसरातील सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. वेगवेगळ्या व्हिडीओची तपासणी केली फोटोंची पडताळणी केली आणि त्यातून 300 आरोपींची ओळख पटवली आहे. आता या आरोपींना अटक करण्यासाठी जहांगीरपुरी परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे. यातले दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे. या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपक पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
– सुप्रीम कोर्टाचा स्थगितीपूर्वी चालले 9 बुलडोझर; डझनभर अतिक्रमित बांधकामे पाडली!!
त्याच वेळी दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात आज सकाळी 10.00 वाजल्यापासून सुमारे दीड तास 9 बुलडोझर चालले. डझनभर अतिक्रमित दुकाने पाडली. पण सुप्रीम कोर्टाने बुलडोजर कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. जहांगिरपुरीतील स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे बुलडोझर प्रत्यक्ष कारवाईच्या जागी स्थगित झाले आहे.
आज सकाळी 10.00 वाजता प्रचंड बंदोबस्तात आणि पोलिसी फौजफाट्यासह उत्तर दिल्ली महापालिकेने जहांगीरपूरी विभागातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवले. या संदर्भातल्या नोटिसा आधीच संबंधित लोकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जहांगीरपुरी भागात प्रचंड जमाव जमला असला तरी कायदेशीर कारवाई करत बुलडोजर आपले काम पार पाडत होते. अतिक्रमित दुकानांवर बुलडोझर चालले. सुमारे एक डझन दुकानांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली. परंतु,बुलडोजर तर चालू असतानाच दीड तासातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि कारवाई तात्पुरती स्थगित करावी लागली.
यासंदर्भात उत्तर दिल्लीचे महापौर इक्बाल सिंग यांनी निवेदन जारी केले आहे. दिल्ली महापालिका कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणार नाही आणि अतिक्रमण देखील सहन करणार नाही. सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यामुळे बुलडोजर कारवाई सध्या थांबवली आहे कोणत्याही धर्माला टार्गेट करून बुलडोजर कारवाई करण्यात येत नाही. फक्त अतिक्रमणे तोडण्यात येत आहेत. परंतु आता सुप्रीम कोर्टाने आदेश काढल्यामुळे त्या आदेशानुसारच बुलडोजर कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे, असे इक्बाल सिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
जहांगीरपुरीत रामनवमी हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून समाजकंटकांनी दंगल केली होती. या दंगलीचा मुख्य आरोपी मोहम्मद अन्सार याने पुष्पा स्टाईल मस्ती दाखवा कोर्टात जाताना आपली हेकडी अजून गेली नसल्याचे दाखवून दिले होते. पोलिसांनी नंतर त्याची हेकडी काढली. पोलिसांनी त्याच्यासह 24 आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत ठेवले आहे. आज त्यांच्या पुढच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी आहे.
परंतु, दरम्यानच्या काळात उत्तर दिल्ली महापालिकेने अतिक्रमणविरोधी ड्राईव्ह सुरू केला. सुमारे दीड तास 9 बुलडोजर चालवल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे आदेश आले. त्यामुळे बुलडोजर कारवाई स्थगित करावी लागली आहे. पण या कारवाईत दीड तासांमध्ये 9 बुलडोझर चालवून सुमारे डझनभर अतिक्रमित दुकाने उध्वस्त करण्यात आली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App