पेपर तपासणीस पर्यवेक्षकानेच ( मॉडरेटर) लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना सातारा रस्ता परिसरातील एका डेअरीजवळ घडली.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पेपर तपासणीस पर्यवेक्षकानेच ( मॉडरेटर) लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना ४ एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास सातारा रस्ता परिसरातील एका डेअरीजवळ घडली.याप्रकरणी विकास पवार (रा. आंबेगाव खुर्द,पुणे ) याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Exam supervisor molestation lady teacher in katraj area
फिर्यादी महिला लेक्चरर असून त्यांच्याकडे १२ वीचे पेपर तपासणीसाठी दिले आहेत. पेपर तपासणीस यांच्यावर पर्यवेक्षणासाठी विकास पवार मॉडरेटर म्हणून नियुक्त आहेत. त्यामुळे अडचणींच्यावेळी फिर्यादी लेक्चरर आणि पवार यांच्यात फोनवर संवाद होत होता.
सोमवारी पेपर तपासणीचे काम संपल्यानंतर त्याने महिलेला लस्सी पिण्याच्या बहाण्याने डेअरीकडे नेले. त्यावेळी त्यांच्या अंगावर हात टाकून विनयभंग केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App