
प्रतिनिधी
रायपूर : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंचे नरसंहाराचे भयानक वास्तव दाखविणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” यावरून देशात मोठा वादंग उसळला असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वादात तेल ओतले आहे. The Kashmir Files: “The Kashmir Files” is nothing but a display of violence; Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghela claims !!
“द काश्मीर फाईल्स” या सिनेमात फक्त हिंसा दाखवली आहे बाकी त्यात काही नाही, असा दावा भूपेश बघेल यांनी हा सिनेमा बघून आल्यानंतर केला आहे. काल सायंकाळी भूपेश बघेल यांनी आपल्या मंत्र्यांसह रायपूरच्या पीव्हीआर थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघितला.
हा सिनेमा केंद्र सरकारने देशभर टॅक्स फ्री करावा त्याच्यावरचा जीएसटी हटवावा. त्यामुळे लोकांसमोर खरंच या सिनेमात काय दाखवले हे लक्षात येईल, असा दावा भूपेश बघेल यांनी केला आहे. भूपेश बघेल यांनी सर्व काँग्रेस आमदारांना आणि भाजप आमदारांना सिनेमा बघण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, भाजपचे आमदार त्यांच्या निमंत्रणावरुन सिनेमा बघायला आले नाहीत. या मुद्द्यावरून देखील बघेल यांनी भाजपला कोसले आहे. भाजपवाल्यांच्या समोर गेले की ते सामना करत नाहीत. ते पळून जातात असे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री श्री @bhupeshbaghel मैग्नेटो माल के PVR में फ़िल्म "कश्मीर फाइल्स" देखने पहुँचे
इस अवसर पर उनके साथ मंत्रीगण, विधायक गण एवं अन्य गणमान्य नागरिक रहे उपस्थित। pic.twitter.com/uDo91Rqcvw
— CMO Chhattisgarh (@ChhattisgarhCMO) March 16, 2022
सिनेमात अर्धसत्य दाखवले
“द काश्मीर फाईल्स” सिनेमांमध्ये अर्धवट सत्य दाखवला आहे. ते सुद्धा तोडून मोडून दाखवले आहे. भाजपच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या सरकारने काश्मिरी हिंदूंना वाचवले नाही. त्यांना काश्मीरमधून निघून जाण्यास सांगितले पण राजीव गांधींनी संसदेचा घेराव केल्यानंतर सरकारने काश्मीरमध्ये सैन्य पाठवले, असा दावा देखील भूपेश बघेल यांनी केला आहे.
इस "कश्मीर फाइल्स" फिल्म में कोई संदेश नहीं है, सब आधा अधूरा है।
केवल हिंसा दिखाने की कोशिश है।
भाजपा वालों के सामने खड़े हो जाओ, तो भाग जाते हैं। भाजपा का कोई व्यक्ति फिल्म देखने नहीं आया। pic.twitter.com/nfb0GcRl4z
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) March 16, 2022
“द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा बघणारे ते काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे अन्य नेते सिनेमा न पाहता या सिनेमावर विविध प्लॅटफॉर्मवर जोरदार टीकास्त्र सोडत असताना भूपेश बघेल यांनी सिनेमा पाहून त्यावर टीकास्त्र सोडले आहे.