विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबमध्ये ९२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीचा (आप) पहिला रोड शो वादात सापडला. रोड शोमध्ये सरकारी खर्चातून आर्थिक रक्कम खर्च होत असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी ‘आप’वर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सुखपाल खैरा यांनी हे व्हायरल पत्र त्यांच्या ट्विटरवर शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत. Aam Aadmi Party’s first road show in controversy Misuse of government machinery; Congress alleges
अमृतसर येथे रोड शो असे शीर्षक असलेले हे पत्र व्हायरल झाले आहे. पंजाब सरकारच्या मुख्य सचिवांकडून आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये विशेष सचिव महसूलसह राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना रोड शोच्या व्यवस्थेसाठी पैसे खर्च करण्यास सांगितले आहे. २३ जिल्ह्यांतील प्रत्येकी २ लाख रुपये उपायुक्त अमृतसर यांच्या खात्यात जमा करावेत, असेही पत्रात लिहिले आहे.
रोड शोमध्ये कामगार आणि लोकांना पोहोचणे सोपे व्हावे यासाठी परिवहन सचिवांना बसेसची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदाराने हा सरकारी पैशाचा पूर्णपणे गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. पंजाब आधीच कर्जबाजारी आहे.
यानंतर सरकारी पैसा प्रचारासाठी वापरणे पंजाबच्या जनतेवर अन्यायकारक आहे. हा पैसा सरकारी तिजोरीत जमा करण्याची मागणी त्यांनी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. खैरा म्हणाले की, ‘आप’ने सत्तेत येण्यापूर्वीच सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू केला आहे.
१००० सरकारी बसेस सामील झाल्या
जवळपास १००० सरकारी बस रोड शोमध्ये सहभागी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील रोडवेज डेपोमधून त्या ‘आप’ कार्यकर्त्यांसोबत अमृतसरला पोहोचल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App