विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : ओडिशामध्ये झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत बिजू जनता दलाचा झेंडा फडकला आहे. एकेकाळी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉँग्रेसचा पूर्ण सुफडासाफ झाला आहे. कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.Biju Janata Dal’s flag in Odisha Zilla Parishad elections
ओडिशाच्या 851 जिल्हा परिषद झोन जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाने मोठा विजय मिळवित 90 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत. बिजू जनता दलाला 585 जागा मिळाल्या तर भाजपा 31 आणि कॉँग्रेसला केवळ 29 जागा मिळाल्या.
बीजेडीच्या 22 वर्षांच्या अखंड शासनानंतरही राज्यात पटनायक सरकारच्या विरोधात कोणतीही सत्ताविरोधी भावना नसल्याचे यावरून दिसून आले आहे. 2017 च्या पंचायत निवडणुकीत बीजेडीने 473 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 297 आणि काँग्रेसने 60 जागा जिंकल्या होत्या.
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बीजेडीने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासूनच युद्धपातळीवर तयारी सुरू केली होती. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्वत: स्मार्ट हेल्थ कार्डचे वितरण करण्यासाठी, कोविड आणि घर दुरुस्तीशी संबंधित विविध सहाय्य योजनांची घोषणा करण्यासाठी अनेक जिल्ह्यांना भेट दिली होती. विशेषत: पश्चिम ओडिशावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App