ओडिशातील घनदाट जंगलातील नक्षलवादी म्होरक्यांचा अड्डा सुरक्षा दलाकडून उद्‌ध्वस्त


वृत्तसंस्था

भुवनेश्वर : ओडिशात सुरक्षा दलांनी मलकानगिरी-कोरापूट सीमेवर नक्षलवाद्यांचा अड्डा उद्‌ध्वस्त केला. त्याआधी दलाची नक्षलवाद्यांशी चकमकही झाली. उभय बाजूंनी दोन तास चकमक सुरू होती. मात्र आंध्र प्रदेशचा नक्षलवादी म्होरक्या सुरेश सुराणाने सुरक्षा दलाच्या हातावर तुरी देत सहकाऱ्यांसह पळ काढला. Security forces attack on naxelies in Odisha

ओडिशा पोलिस व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मलकानगिरी आणि कोरापूट जिल्ह्यातील बाडिली टेकड्यांच्या परिसरात नक्षलवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. येथील नक्षलवाद्यांनी दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युतरादाखल दलातील जवानांनीही गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आंध्र प्रदेशातील नक्षलवादी म्होरक्या सुरेश सुराणाने साथीदारांसह पलायन केले.त्यांच्या शोधासाठी ओडिशा-आंध प्रदेशच्या सीमेवर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी सहा काडतुसे, चार डिटोनटर, वॉकीटॉकी आदी जप्त केले. ओडिशा पोलिसांनी नुकतीच कोरापूट जिल्ह्यातून वाँटेड नक्षलवादी दुब्बासी शंकर उर्फ महेंदरला अटक केली होती.

Security forces attack on naxelies in Odisha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती