आठ वर्षापूर्वी मारलेले गेलेले आठ जण नक्षलवादी नव्हतेच, चकमकीचा न्यायिक चौकशी अहवाल सादर


विशेष प्रतिनिधी

रायपूर – सुमारे आठ वर्षापूर्वी बिजापूर जिल्ह्यातील एडेसमेटा येथे चकमकीत मारलेले गेलेले आठ जण नक्षलवादी नव्हते, असा निष्कर्ष एका न्यायिक समितीने आपल्या अहवालातून काढला आहे. eight people killed eight years ago were not Naxalites

न्यायिक समितीचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. अग्रवाल यांनी सुरक्षा दलाने भीतीपोटी गोळीबार केला असावा, असा अंदाज अहवालात वर्तविला आहे.

एडेसमेटा येथे १७ ते १८ मे २०१३ च्या रात्री चकमक झाली होती. तत्पूर्वी सुकमा जिल्ह्यात झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासह २७ जण ठार झाले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहीम राबविली जात असताना एडेसमेटा येथे कारवाई झाली. परंतु या कारवाईत मारलेले नागरिक नक्षलवादी नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी एडेसमेटा येथे नक्षलवादी नसल्याचे म्हटले होते, तर त्याचवेळी सीआरपीएफच्या कोब्रा पथकाने नक्षलवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड केल्याचा दावा केला होता. न्यायिक अहवालात म्हटले की, २५ ते ३० जण बीज मंडप नावाच्या आदिवासी सणासाठी एकत्र झाले होते. त्याठिकाणी एक हजार सुरक्षा कर्मचारी दाखल झाले. जर सीआरपीएफच्या जवानाकडे सुरक्षेची पुरेशी साधन असती आणि त्यांच्याकडे आदिवासीसंबंधीची अचूक माहिती असती तर ही घटना टळली असती. जमावाने आपल्यावर हल्ला केल्याचे सुरक्षा दलाने म्हटलेले असताना दुसरीकडे तपासात मात्र सुरक्षा दलाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, असे म्हटले आहे

eight people killed eight years ago were not Naxalites

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात