विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॉँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वत:च्या पत्नीचे मतही मिळू शकणार नाही, असा घरचा आहेर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मनीष तिवारी यांनी केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होत असतानाच काँग्रेस खासदार व नेते मनीष तिवारी यांनी आज आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.Fwd: Many star Congress campaigners will not even get the vote of his wife, MP Manish Tiwari’s critisism
काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी जे स्टार प्रचारक निश्चित केले आहेत त्यावरून तिवारी यांनी उघडपणे पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केले.काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांना पंजाबमध्ये स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याकडे लक्ष वेधले असता तिवारी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला.
‘मला स्टार प्रचारक बनवावं किंवा बनवू नये हा सर्वस्वी पक्षनेतृत्वाचा निर्णय आहे. त्याविषयी मी काही बोलणार नाही. मात्र, या यादीत असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वत:च्या पत्नीचे मतही मिळू शकणार नाही. मनीष तिवारी यांना सध्या पक्षात काहीसे साइडलाइन करण्यात आले आहे. त्यावरही ते बोलले.
ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही काही नेत्यांनी एक पत्र लिहिलं होतं. पक्षात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे आम्ही सांगितले होते. तेव्हापासूनच जो एकप्रकारचा तणाव निर्माण झाला आहे तो आजही कायम आहे. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबतचा घटनाक्रम घडला. त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं.
त्यावेळी मीसुद्धा इतरांप्रमाणे अमरिंदर यांच्याविरुद्ध बोलावं असं काहींचं म्हणणं होतं. मात्र, ते कदापि शक्य नाही. तो माझा स्वभावच नाही, असे तिवारी यांनी सुनावले. अमरिंदर यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आज नाही तर गेल्या ५० वर्षांपासून आमचा घरोबा आहे.
त्यात कोणत्याही कारणाने कटुता येण्याची अजिबात शक्यता नाही, असे तिवारी यांनी सांगितले. अमरिंदर हे कुणाच्या तरी इशाºयावर सरकार चालवत होते हा आरोप निव्वळ बालिशपणाचा होता, असेही त्यांनी पक्ष नेत्यांना सुनावले. ते आजतक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App