काँग्रेसने स्टार कँपेनरच्या यादीतून वगळलेले खासदार मनीष तिवारी म्हणाले, पंजाबमध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आमदारांचा!!

वृत्तसंस्था

आनंदपूर साहिब : पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. काँग्रेसचे नेते एकमुखाने प्रचार करण्याऐवजी अनेक तोंडाने बोलताना दिसत आहेत. सगळा मामला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जाहीर करण्याभोवती आणि न करण्याभोवती फिरताना दिसत आहे. congress mp manish tiwari slams congress high command over issue of chief ministership of punjabकाँग्रेसचे आनंदपूर साहिबचे खासदार आणि बंडखोर नेते मनीष तिवारी यांची या नेत्यांमध्ये भर पडली आहे. काँग्रेसने परवा जाहीर केलेल्या पंजाबच्या स्टार कँपेनरच्या यादीतून मनीष तिवारी यांना वगळले आहे. त्यामुळे ते भडकले आहेत. पण त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासारखी आदळआपट केलेली नाही, तर काँग्रेस हायकमांडला चिमटे काढून घेतले आहेत.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार हा निवडून आलेल्या आमदारांचा आहे. पण प्रचार कोणाच्या नेतृत्वाखाली करावा, हे ठरविण्याचा अधिकार पक्षाचा आहे, असे वक्तव्य मनीष तिवारी यांनी केले आहे. एकाच वेळी काँग्रेस हायकमांडला चुचकारण्याचा आणि चिमटा काढण्याचा हा प्रकार मनीष तिवारी यांनी केला आहे. आपले नाव स्टार कँपेनरच्या यादी नसल्याचे आपल्याला आश्चर्य वाटलेले नाही, तर पत्रकारांना त्याचे आश्चर्य वाटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

congress mp manish tiwari slams congress high command over issue of chief ministership of punjab

महत्त्वाच्या बातम्या