विशेष प्रतिनिधी
पुणे : पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या शिवमहोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. Inauguration of Shiv Mahotsav ceremony in Lal Mahal
लाल महालात शस्र व शिवकालीन नाण्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन दि. १८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. याचा सर्व पुणेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या प्रसंगी सारिका शिरोळे, अमृता मगर, सुवर्णा बनबरे, शालिनी शिंदे, सोनाली धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सुवर्णा बनबरे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले, तर कैलास वडघुले यांनी आभार मानले. संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, संतोष शिंदे, युवराज ढवळे, मयूर शिरोळे, अक्षय रणपिसे, सचिन जोशी आदी उपस्थित होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App