विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफवा पसरवणारे आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याचा इशारा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती.Anurag Thakur warns against spreading rumors, anti-India conspiracy by websites, YouTube channel
आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.अनुराग ठाकूर म्हणाले, मी खोटी माहिती पसरवणाºया वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे.
यु ट्यूबने देखील समोर येत अशा यु ट्यूब चॅनल्सला ब्लॉक केले आहे.गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी डिसेंबर २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती.
यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, असे ठाकूर यांनी सांगितले.बंदी घातलेले यु ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते.
या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती, असे ठाकूर यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App