२०२२ मध्ये कोल्हापुरात महिलांसाठी खास बस सेवा सुरू होणार

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या आसपास बरीच खेडेगाव आहेत. छोटी शहरे आहेत. ह्या गावातून कोल्हापूरात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी, व्यवसायासाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. म्हणून कोल्हापूर महानगरपालिका परिवहन मंडळातर्फे महिलांसाठी स्पेशल बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे.

Special bus service for women will be started in Kolhapur in 2022

नव्या वर्षात ही सेवा सुरू व्हावी ह्यासाठी महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून मत घेतले जाणार आहे. त्यांनंतर कोणत्या रुटसाठी बस सेवा सुरू करण्यात येईल ह्याबद्दल फायनल निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती केएमटीचे पब्लिक रिलेशन ऑफिसर संजय इनामदार यांनी दिली आहे.


गुगल मॅप्समधील नवीन फीचर ‘एरिया बिझीनेस’ दाखवणार कुठे, किती गर्दी आहे


बस सेवा ही महिलांसाठी वेगळी असणे गरजेचे आहे कारण काही मार्गावर बस मध्ये बरीच गर्दी असते. आणि महिलांसाठी राखीव जागांवर देखील महिलांना बसता येत नाही. म्हणून ही नवी बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे.

त्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी महिलांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. कारण 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून ही बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे. पाहिल्यावेळी एकूण 4 बस सुरू करण्यात येतील. त्यांनंतर अर्जात आलेल्या माहितीच्या आधारे ही संख्या वाढण्यात येणार आहे.

Special bus service for women will be started in Kolhapur in 2022

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात