विशेष प्रतिनिधी
चेन्नई : व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयाचे कामकाज सुरू असताना त्यात सहभागी असलेला वकील आर.डी. संतना कृष्णन एका महिलेबरोबर अश्लील चाळे करत असतानाची चित्रफीत समाज माध्यमावर झळकली आहे.Lawyer suspended for having obscene with woman, suspended via video conference
या गैरकृत्याची गंभीर दखल घेऊन त्या वकिलावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला. आर. डी. संतना कृष्णन यांना वकिली व्यवसायातून न्यायालयाने निलंबित केले आहे.
उच्च न्यायालयाचे न्या. जी. के. इलाथिराईयन यांच्यापुढे एका खटल्याची सुनावणी असताना हा प्रकार घडला. त्याची दखल घेऊन न्या. पी. एन. प्रकाश व न्या. आर. हेमलता यांच्या खंडपीठाने त्या वकिलावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे ठरविले.
खंडपीठाने म्हटले आहे की, न्यायालयाचे कामकाज सुरू असताना एका वकिलाने जो अश्लील प्रकार केला तो अत्यंत चुकीचा आहे. त्याची चित्रफीतही उपलब्ध आहे. असे गैरप्रकार प्रकार घडत असताना न्यायालय अजिबात गप्प बसणार नाही.
न्यायालयाचे कामकाज हे सार्वजनिक स्वरूपाचे असते. अशा ठिकाणी वकील आर.डी. संतना कृष्णन यांनी एका महिलेबरोबर केलेल्या अश्लील चाळ्यांची क्राइम ब्रँच किंवा सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
खंडपीठाने म्हटले आहे की, या अश्लील दृश्याची चित्रफीत समाज माध्यमांवर झळकणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहितेच्या इतर कायद्यांद्वारे गुन्हा आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मद्रास उच्च न्यायालयाला सादर करण्यात आला.
वकिलाने महिलेबरोबर केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमावरून काढून टाकावा, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. आता अनेक वकील खटल्यांच्या कामकाजासाठी न्यायालयात उपस्थित राहात आहेत. तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाचे कामकाज चालविण्याच्या पयार्याचा फेरविचार करता येईल का, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App