विशेष प्रतिनिधी
मुंबई : आलिया भटची प्रमुख भूमिका असणारा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच जगातील सर्वात मोठ्या बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
Gangubai Kathiawadi Cinema will be screened at the Berlin Film Festival
याआधी 2019 मध्ये आलिया भट्टची प्रमुख भूमिका असणारा गली बॉय हा झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला सिनेमा बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला होता. तर आता आलियाचा हा दुसरा चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. 2021 मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी 25 वर्षे पूर्ण केलेली आहेत. आजवर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेले आहेत. बाजीराव मस्तानी, पद्मावत, खामोशी, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक, रामलीला असे अनेक यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलेले आहे.
2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा
गंगूबाई काठियावाडी हा गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. मुंबईमधील कामाठीपुरा भागामधील सर्वात शक्तिशाली, आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणार्या गंगुबाई यांची भूमिका आलिया भटने साकारली आहे. हुसेन जैदी यांच्या मुंबईच्या माफिया क्वीन्स या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे.
गंगुबाई यांचा गुजरात मधील सधन घरात जन्म झाला होता. तरुण वयात एका मूलावर प्रेम जडले. त्याच्या सोबत संसार थाटण्याचे स्वप्न घेऊन त्या मुंबई मध्ये पळून आल्या. त्यानंतर त्या मुलाने त्यांना एका दलालला विकले. इच्छा नसताना त्यांना वेश्या वस्तीत काम करावे लागले. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास भारतातील सर्वात श्रीमंत कोठा असणाऱ्या स्त्री पर्यंत कसा झाला हे दाखवणारा हा सिनेमा असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App