क्यू भाई चाचा, हाँ भतीजा!!; यूपीत अखिलेश – शिवपाल पुन्हा राजकीय मेतकुट!!; पण यादव बँकेची एकजूट होणार??


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : अखेर सहा वर्षांच्या दुराव्यानंतर उत्तर प्रदेशातले चाचा – भतीजा पुन्हा एकत्र आले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि त्यांचे काका प्रगतिशील समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांचे राजकीय मेतकूट पुन्हा जमले आहे. गेल्या पाच वर्षाचा सत्ता गमावलेला अनुभव या दोघांना राजकीय मजबुरीने एकत्र घेऊन आला आहे.Akhilesh and shivpal yadav again came together to fight with BJP in U P

मनाचा मोठेपणा दाखवत अखिलेश यादव यांनी काकाश्री शिवपाल यादव यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. चरणस्पर्श केला. काकांनीही पुतण्याला आलिंगन दिले. पण हा सगळा प्रकार अखेरीस केवळ राजकीयच ठरल्याचे निष्कर्ष उत्तर प्रदेशातील वरिष्ठ पत्रकार यांनी काढले आहेत.



समाजवादी पक्षाची “वाय – एम” अर्थात यादव – मुस्लिम व्होट बँक तर कधीच फुटली आहे. निदान उरलेली यादव व्होट बँक तरी आपल्या खिशात कायम राहावी या हेतूने काका-पुतणे एक झाल्याचे महेश त्रिपाठी या वरिष्ठ पत्रकार यांचे म्हणणे आहे. यादव काका-पुतणे एक झाले तर ५० ते ६० जागांवर यादव व्होट बँक फुटणार नाही, अशी दोघांची अपेक्षा आहे. त्यामुळे दोघांनी अंतर राखून का होईना पण एकमेकांची साथ द्यायचे ठरवले दिसते आहे.

समाजवादी पक्षाला 2017 च्या निवडणुकीत 22 % मते मिळाली होती गोपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्ष लोहिया यांना 0.3 % मते मिळाली होती. शिवपाल यादव एकटेच आमदार झाले. बाकी सगळे पडले. पण ते समाजवादी पक्षाचे किमान 60 उमेदवार घेऊन पडले.

त्यामुळे समाजवादी पक्षाला जोरदार तडाखा बसला होता. त्यामुळेच आता अखिलेश यादव यांनी जुने गिले शिकवे विसरून काकांकडे धाव घेतली आहे आणि काकांनीही आपली आपली उरलेली राजकीय कारकीर्द सन्मानाने घालवण्याचे ठरवून पुतण्या बरोबर राजकीय समझोता केला आहे.

काकांच्या समाजवादी पक्षात सन्मान होईल, असे वक्तव्य अखिलेश यांनी आधीच केले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसा योगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी हितगुज केले आहे तसे हितगुज काका-पुतण्यांनी केलेले नाही. ते दोघे एकमेकांना बरोबर उभे असले तरी त्यांच्यातले अंतर जाणवण्याइतपत मोठे आहे. अखिलेश यादव यांनी मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्यापेक्षा छोट्या पक्षांबरोबर आघाडी करणे पसंत केले आहे.

त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, सुहेलदेव पार्टीचे ओमप्रकाश राजभर आणि आता आपलेच काका शिवपाल यादव यांची यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्ष लोहिया या पक्षाशी आघाडी केळ्याचा करण्याची खेळी केली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाला फार मोठा लाभ होणार नसला तरी त्यांचे मोठे नुकसान देखील टाळण्याची शक्यता आहे, असे अखिलेश मानत आहेत.

Akhilesh and shivpal yadav again came together to fight with BJP in U P

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात