विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली मधील वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी १३ डिसेंबर रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डोंबिवली येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. वेद आणि उपनिषदे पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा ध्यास त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत घेतला होता.त्यांच्या मागे मुलगा भालचंद्र, मुलगी डॉ.पल्लवी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. Vedmurti Doctor Bhimrao Kulkarni died in Dombivali
संस्कृत विषयावर पगडा असलेल्या भीमराव यांना संपूर्ण ऋग्वेदाचा टिपणीसहित अनुवाद करण्यासाठी ११ वर्षाचा कालावधी लागला. प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्यांनतर भीमराव यांनी १९९६ पासून वेदाच्या अनुवादाला सुरुवात केली.त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचन केले. २००७ मध्ये पहिला मराठी ऋग्वेद प्रसिद्ध झाला .त्यानंतर७ वर्षानंतर २०१३ मध्ये यजुर्वेद प्रसिद्ध झाला. तर २०१३ ते २०२० या कालावधीत त्यांनी सामवेद आणि अथर्ववेदाचे मराठी अनुवाद करत संस्कृतीचा हा ठेवा पुढच्या पिढीसाठी उपलब्ध केला आहे.
मे महिन्यापासून त्यांनी उपनिषदाचे अनुवाद करण्याचे काम सुरू केले होते. दिवसातले ७ ते ८ तास लिखाणाचे काम करत परमेश्वराने सोपविलेली जबाबदारी पूर्ण केली. विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा जोमाने लिखाणाचे काम सुरू ठेवले होते .सोमवारी ( ता.१३ ) संध्याकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App