वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसची पूर्णपणे राजकीय पंगा घेण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. आज तृणमूल काँग्रेसने दुहेरी चाल खेळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हजेरी लावली आहे. पण उद्या काँग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीस तृणमूल काँग्रेसचे नेते हजर राहणार नाहीत, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. यातच ममता बॅनर्जी यांच्या दुहेरी खेळीचे मर्म दडले आहे. Mamata’s double move; Trinamool Congress leader attends Modi’s all-party meeting; But I will avoid tomorrow’s Congress meeting!!
उद्या 29 नोव्हेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याला काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी तसेच बाकीचे सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित आहेत. या तृणमूल काँग्रेसनेही सहभाग नोंदवला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज दुपारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सही तृणमूल काँग्रेसचे नेते हजेरी लावणार आहेत.
परंतु उद्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे तिला मात्र तृणमूळ काँग्रेसचे नेते हजर राहणार नाहीत, असे सुदीप बॅनर्जी यांनी जाहीर करून तृणमूल काँग्रेसची नेमकी राजकीय चाल उघडपणे स्पष्ट केली आहे.
तृणमूल काँग्रेस इथून पुढच्या काळात काँग्रेस पक्षाच्या छायेखाली राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर स्वतंत्रपणे केंद्रातल्या भाजप सरकारला विरोध करेल असेच तृणमूल काँग्रेसचे धोरण सुदीप बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी यांची पुढची राजकीय सार काँग्रेस सोडून सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याची असू शकेल. त्याचबरोबर सर्व विरोधी पक्षांना काँग्रेसच्या छायेखाली बाहेर काढण्याचेही ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न असू शकतात असेच त्यांच्या राजकीय खेळीतून सूचित होताना दिसते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App