नारायण राणे आणि निलेश साबळेच्या भेटीचा एक फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Let the wind blow: That’s exactly what happened. Nilesh Sable had to hold Narayan Rane’s legs
विशेष प्रतिनिधी
मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय चाला हवा येऊ द्या कार्यक्रम दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.हा शो सध्या सगळीकडे चर्चेत आहे.अनेकदा या शोमध्ये विंडबनात्मक स्किट केलं जातं. पण यातील एका स्किटमुळे शोचे सूत्रसंचालक निलेश साबळेला नारायण राणेंची माफी मागावी लागली आहे.
निलेश साबळे आणि टीमने नोव्हेंबर रोजीकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. नारायण राणे आणि निलेश साबळेच्या भेटीचा एक फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'चला हवा येऊ द्या' चे निलेश साबळे व टीमने आज केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. झी मराठी वर झालेल्या 'दिवाळी अधिवेशन' या कार्यक्रमात जे पात्र दाखविण्यात आले होते त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. #माफी @NiteshNRane pic.twitter.com/Fm91D3l8cq — vikas pawar ( मोदी का परिवार ) (@vikaspawar5) November 21, 2021
'चला हवा येऊ द्या' चे निलेश साबळे व टीमने आज केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. झी मराठी वर झालेल्या 'दिवाळी अधिवेशन' या कार्यक्रमात जे पात्र दाखविण्यात आले होते त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. #माफी @NiteshNRane pic.twitter.com/Fm91D3l8cq
— vikas pawar ( मोदी का परिवार ) (@vikaspawar5) November 21, 2021
झी टीव्ही वर नुकताच ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात नारायण राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. यामध्ये राणेंबाबत काही नकारात्मक कंटेट होता. त्यामुळे राणे समर्थकांनी फोन करुन भावना दुखावल्याचं सांगितल्याने निलेश साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली.
यावेळी निलेश साबळे यांनी राणेंची माफी मागितली आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App