मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. President Ramnath Kovind to visit Raigad on December 7; Information given by Chhatrapati Sambhaji Raje through tweet
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगडाला भेट देण्याचं निमंत्रण खासदार संभाजीराजेंनी दिलं होत. यासंदर्भात संभाजीराजेंनी एक ट्वीट केलं आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, “राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि.७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात राष्ट्रपती सोबत सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App