CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश


विशेष प्रतिनिधी

शिलाँग : सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाला ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. पक्षाच्या देशव्यापी विस्ताराची मोहीम हाती घेतलेल्या ममता दीदींनी कॉंग्रेसचे अनेक नेते आपल्या गटात सामील करून घेतले आहेत. CONGRESS VS TMC: Mamata Didi’s Modi visit in Delhi avoiding Sonia- Trinamool hits Congress in Meghalaya! Trinamool entry of 12 out of 18 MLAs including Mukul Sangam

विविध राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षातील नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटल्या मात्र त्यांनी सोनियांना भेटणे देखील टाळले आहे. इकडे ममता बॅनर्जी दिल्लीत असताना तिकडे ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे.



काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्काच मानला जात आहे. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेटली. मात्र ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणे मात्र टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधींसोबतच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या की, त्यांना भेटण्याचा कुठलाही कार्यक्रम नाही आहे.

ते लोक पंजाबच्या निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यानंतर त्या म्हणाल्या की, आम्ही सोनिया गांधी यांना प्रत्येक वेळी भेटलं पाहिजे का, घटनात्मकरीत्या हे अनिवार्य नाही आहे?

CONGRESS VS TMC: Mamata Didi’s Modi visit in Delhi avoiding Sonia- Trinamool hits Congress in Meghalaya! Trinamool entry of 12 out of 18 MLAs including Mukul Sangam

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात