वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे; हिंगोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारतेय घनदाट जंगल


विशेष प्रतिनिधी

हिंगोली: शहरामध्ये घनदाट जंगल निर्मितीला सुरुवात झाली आहे. केवळ सव्वा एकर भूभागावर शास्त्रीय पद्धतीने थोडेथोडके नव्हे तर तब्बल एकवीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.  dense forest in Hingoli; 21 thousend trees planted

शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये हे हिरवेगार जंगल उदयास येत आहे. मियावाकी वृक्ष लागवड पद्धत म्हणजेच घन-वन प्रकल्प अंतर्गत सिमेंटच्या जंगलामध्ये हे झाडांचे जंगल तयार होत आहे.

हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व सेवानिवृत्त तत्कालीन विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाला सुरुवात झाली. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह कळमनुरी येथील तहसील कार्यालय व हिंगोली तहसील कार्यालय तसेच जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात देखील अशा प्रकारचा प्रकल्प राबवला जातोय.

या घन-वन प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील वातावरणात नैसर्गिक रित्या टिकाव धरणाऱ्या व लुप्त होत चाललेल्या विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती व विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात देखील तेथील मागणीनुसार अशा प्रकल्पांची निर्मिती करण्याचा मानस हिंगोलीचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक यांनी व्यक्त केला आहे.

  •  सव्वा एकरात २१ हजार झाडांची लागवड
  •  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवेगार जंगल
  •  घन-वन प्रकल्पामध्ये दुर्मिळ झाडांचे संगोपन
  •  प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक यांच्या प्रयत्नांना यश

dense forest in Hingoli; 21 thousend trees planted

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात