पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या गावठी हातबॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दहा वर्षांच्या मुलासह आई जखमी झाली. माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ ह प्रकार घडला. घटनास्थळी पोलिसांना 25 हातबॉम्ब सापडले असून ते शिकारीसाठी तयार करण्यात आल्याचा संशय आहे. One killed in village bomb blast, suspected of making bombs for hunters
विशेष प्रतिनिधी
रायगड : पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या गावठी हातबॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दहा वर्षांच्या मुलासह आई जखमी झाली. माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ ह प्रकार घडला. घटनास्थळी पोलिसांना 25 हातबॉम्ब सापडले असून ते शिकारीसाठी तयार करण्यात आल्याचा संशय आहे.
संदेश आदिवासी चौहान (वय – 45) याचा जागीच मृत्यू झाला. संदेश याची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40) मुलगा सत्यम संदेश चौहान(वय -10) जखमी झाले आहेत.
संदेश पत्नी मजिनाबाई मुलगा सत्यम यांच्यासह माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होता. संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांच्या हाताला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले 25 गावठी हातबाँम्ब सापडले आहेत. मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App