विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉँग्रेस पूर्णपणे संभ्रमात सापडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. स्टँड-अप कॉमेडियन वीर दास याच्या व्हिडओ क्लिपवरून वाद रंगला आहे. वीर दासला पाठिंब्यावरूनही काँग्रेसमध्ये तर गट पडले आहेत. एक गट वीर दासला पाठिंबा देतोय तर दुसरा विरोध करत आहे.In the Confused Congress, two groups on Veer Das’s video
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील जॉन एफ केनेडी सेंटरमधील वीर दासचा हा व्हिडिओ आहे. सहा मिनिटांचा हे सादरीकरण त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केले. तेव्हापासून वाद सुरू आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये वीर दासने भारतीयांचे दुहेरी चरित्र मांडले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर आणि कपिल सिब्बल यांनी वीर दासचा बचाव केला आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्हिडिओ क्लिपवर आक्षेप घेतला आहे. हा देशाचा अपमान असल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे.
वीर दास खºया अथार्ने स्टँडअप कॉमेडियन आहे. स्टँडअप कॉमेडी म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या उभे राहणे नव्हे तर मानसिकदृष्ट्याही उभे राहणे, हे वीर दास जाणतो. ६ मिनिटे बोलून त्याने लाखो लोकांचे मत मांडले. अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. पण ते गंभीर आहेत. शानदार’, असे ट्विट थरूर यांनी वीर दासच्या बाजूने केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही वीर दासच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. येथे दोन भारत आहेत यात शंका नाही. आपण भारतीय म्हणून हे जगाला सांगावे असे वाटत नाही ही वेगळी बाब आहे. आपण असहिष्णू आणि ढोंगी आहोत’, असे सिब्बल म्हणाले.
थरूर आणि सिब्बल यांच्या बरोबर उलट भूमिका अभिषेक मनु सिंघवी यांनी घेतली आहे. सिंघवी यांनी वीर दासच्या व्हिडिओ क्लिपला कडाडून विरोध केला. ते म्हणाले, काही व्यक्तींच्या दुष्कृत्यांचा संबंध सर्वांशी जोडून संपूर्ण देशाची जगासमोर बदनामी करणे योग्य नाही. ब्रिटीश राजवटीत पाश्चिमी राष्ट्रांसमोर भारताला गारुडी आणि लुटारूंचा देश म्हणून मांडणाºयांचे अस्तित्व संपलेले नाही.
स्टँड-अप कॉमेडियन वीर दासची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये त्याने अनेक मुद्दे मांडले आहेत. घेतला. भारतीयांची दोन चित्रे सादर केली. यामध्ये कोविड-19, वायू प्रदूषण, क्रिकेट आणि बलात्कारांचा समावेश आहे.
व्हिडिओमध्ये त्याने भारतीयांचे दुहेरी चरित्र सांगितले आहे. म्हणजे भारतीय दिवसा महिलांची पूजा करतात आणि रात्री त्यांच्या सामूहिक बलात्कार करतात. यावरून वीर दासवर सोशल मीडियातून टीका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App