उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नात सुषमा चौधरी हिने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. विवाहातील वायफळ खर्च टाळून सुषमा चौधरी हिनं तब्बल ५० लाख रुपयांची मदत हृदयरोगानं पीडित मुलांसाठी दान केली आहे.Vice President Venkaiah Naidu’s granddaughter’s ideal, Rs 50 lakh for children with heart disease
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नात सुषमा चौधरी हिने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. विवाहातील वायफळ खर्च टाळून सुषमा चौधरी हिनं तब्बल ५० लाख रुपयांची मदत हृदयरोगानं पीडित मुलांसाठी दान केली आहे.
लग्नासाठीचा खर्च टाळून सुषमा हिनं गरीब मुलांसाठी मदतीचा हात पुढे करत आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे. बालदिनाच्या निमित्तानं सुषमा हिनं ५० लाख रुपयांचा निधी दान म्हणून दिला. रविवारी आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हैदराबाद स्थित ‘हृदय – क्योर ए लिटिल हार्ट फाऊंडेशन’ या संस्थेकडे हा चेक सोपवण्यात आला आहे. आजी-आजोबा आणि आई-वडिलांच्या मदतीनं सुषमानं हा ५० लाख रुपयांचा निधी उभा केला.
Venkaiah Naidu : जेव्हा सभागृहाचं पावित्र्य नष्ट होतं … तेव्हा व्यंकय्या नायडू यांना अश्रू अनावर होतात : राज्यसभा सभापती का झाले भावूक?
सुषमाच्या म्हणण्यानुसर, येत्या महिन्यात ती विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र, गरीब मुलांच्या उपचारात मदत व्हावी यासाठी विवाह समारंभात होणारा वारेमाप खर्च टाळून साधेपणानं विवाह सोहळा करण्याचा निर्णय सुषमा आणि तिच्या कुटुंबीयांनी घेतलाय.
२००१ मध्ये ‘स्वर्ण भारत ट्रस्ट’ची स्थापना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशातल्या नेल्लोरमध्ये केली होती. या ट्रस्टकडून गरीब, अनाथ आणि विशेष आवश्यकता असणाऱ्या मुलांसाठी एक शाळा चालविली जाते. तसंच संस्थेद्वारे महिला आणि तरुणांसाठी ‘स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम’ही राबवला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App