शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करून त्याला अधिक पैसा मिळू द्या अस आवाहन गडकरी यांनी केले आहे.Wheat is cheap but bread is expensive; Let him get more money by adding value to farmers’ raw materials – Nitin Gadkari
विशेष प्रतिनिधी
नागपूर : हिंगणा येथे अशोका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते .यावेळी बोलताना त्यांनी आवाहन केले आहे की , शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करून त्याला अधिक पैसा मिळू द्या.तसेच गडकरी म्हणाले की , आपल्याकडे अस समीकरण आहे की शेतकऱ्याचा कापूस स्वस्त तर कपडा महाग आहे आणि गहू स्वस्त तर ब्रेड महाग.
पुढे गडकरी म्हणाले की , यापूर्वीही श्यामकुळे परिवाराने कर्ज घेऊन दोन उद्योग सुरू केले. ते कर्ज त्यांनी पूर्ण परत केले. कर्ज घेणे सोपे आहे, पण परत करणे कठीण आहे. पण अमोल श्यामकुळे यांनी कर्ज परत केले त्यामुळे ते यशस्वी उद्योजक असल्याचे सिध्द झाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत अस सांगत हिंगण्याच्या भागातील नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी उपलब्ध होऊ शकते.अस देखील गडकरी म्हणाले.
पुढे गडकरी म्हणाले की , जलसंधारणाच्या या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. तसेच विजेच्या पंपाऐवजी सोलर पंप वापरला, तर या भागातील शेतकऱ्यांची गरिबी तसेच उपासमार संपेल अन कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही. दरम्यान विदर्भाचा विकास केवळ भाषणांमुळे होणार नाही तर सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असेही गडकरी म्हणाले.
अशोका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटनप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, जि.प.तील भाजपाचे गटनेते आतिष उमरे, प्रज्ञा म्हस्के, अरुण कोहळे, मधुसूदन रुंगठा, श्रीमती रेणुका श्यामकुळे, पल्लवी श्यामकुळे, अमोल श्यामकुळे आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App