नितीन गडकरी यांचे हे स्वप्न असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खाते बदलत नाहीत!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई १३५० किमी लांबीचा एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करत संपूर्ण जगातील मेगा प्रोजेक्ट पैकी एक प्रोजेक्ट करणे आणि देशात २२ ग्रीन कॉरिडोअर बनविणे हे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खाते बदलत नाही.As this is Nitin Gadki’s dream, Prime Minister Narendra Modi does not change his ministry

नुकत्याच एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात गडकरी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांना विचारण्यात आले की २०१४ पासून जवळपास सर्व मंत्र्यांची खाती बदलली. पण तुमचे खाते का काढून घेतले नाही? यावर गडकरी म्हणाले, १९९५ साली जेव्हा महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये मी मंत्री झालो. तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते.माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. माझ्या कार्यकाळात ५५ उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मुंबई-पुणे महामार्ग हे तीन प्रकल्प पूर्ण केले. १९९९ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले. त्यावेळी माझ्याकडे गावांना जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेवर काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. या कामात मी स्वत:ला झोकून दिलं. देशाच्या विकासाठी हे मी माझं कर्तव्य समजतो.

गडकरी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांचे भले व्हावे हीच माझी धारणा आहे. पंतप्रधान मोदींनी संधी दिली आणि गंगेच्या शुद्धीकरणाचे काम करण्याचे भाग्य लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला आत्मनिर्भर करण्याची जी संकल्पना आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही दृढ निश्चयानं काम करत आहोत. देशाच्या विकासासाठी कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

देशात प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी आम्ही इंधनाच्या विविध पर्यायांवर काम करत आहोत, असे सांगून गडकरी म्हणाले, मिथेनॉलचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचे प्रयोग केले जात आहेत. अन्नदाता शेतकरी उर्जादाता देखील व्हावा अशी आमची इच्छा आहे. “दिल्ली ते देहरादून, दिल्ली ते कटारा, दिल्ली ते श्रीनगर हे ग्रीन कॉरिडोअर ड्रीम प्रोजेक्ट आहेत. येत्या काळात पेट्रोल आणि इलेक्ट्रीक कारच्या किमती बरोबरीच्या असतील.

As this is Nitin Gadkari’s dream, Prime Minister Narendra Modi does not change his ministry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण