महाराष्ट्रातली चिखलफेक नाना पटोले – संजय राऊतांना असह्य!!; मोठ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत अतिशय अस्वस्थ झाले आहेत. दोन मोठ्या पक्षाच्या नेत्यांमधली ही चिखलफेक महाराष्ट्राची बदनामी करते आहे. ही बदनामी थांबवावी, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.Mud throwing from Maharashtra Nana Patole – Unbearable for Sanjay Raut !!; An appeal for adult attention

तर खासदार संजय राऊत यांना देखील ही चिखलफेक असह्य झाली असून आता मोठ्या नेत्यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मूळात ज्यांनी सुरू केली ते किरीट सोमय्या कुठल्या बिळात लपून बसले आहेत, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्रातले दोन ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये चाललेली चिखलफेक थांबवावी. त्याचबरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या या राजकीय कलगीतुऱ्यामध्ये काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी परखड मते व्यक्त केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर तुटून पडून जर सगळा “राजकिय शो” आपल्या बाजूने वळवून घेत असतील आपल्याला काय उरेल?,

याची चिंता शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांना भेडसावत असल्याचे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यातूनच नाना पटोले आणि संजय राऊत यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून साधारणपणे एकाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. या दोघांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप-प्रत्यारोपांचे संदर्भात लक्ष घालून ते थांबवायला सांगितले आहे.

अर्थात नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांनीही नंतर भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस पक्ष जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येतो आणि म्हणूनच 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये गावांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलने करतील, असे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

Mud throwing from Maharashtra Nana Patole – Unbearable for Sanjay Raut !!; An appeal for adult attention

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात