विशेष प्रतिनिधी
मुबंई : पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? अतिशय हॉरर, भयानक आणि समाजातील एका कडव्या सत्य गोष्टीची जाणीव करून देणारा हा सिनेमा मराठीतील एक सुपरहिट सिनेमा होता. पूजा सावंत हिच्या अॅक्टींगचे कौतुकही प्रचंड झाले होते. तर ह्या सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘छोरी’ नावाचा सिनेमा हिंदीमध्ये येणार आहे. सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री नुसरत भरुचा या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
The teaser of Chhori movie starring Nusrat Bharu has raised expectations
या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि या टीजरमुळे या सिनेमाच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. 26 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशाल फुरिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर या सिनेमामध्ये नुसरत भरुचा सोबत वैशिष्ट्, राजेश चाळीस, सौरभ गोयल हे कलाकार पाहण्यास मिळतील. टी सीरिजद्वारे बनवला जाणार्या या सिनेमाचे निर्माते विक्रम मल्होत्रा आणि जॅक डेव्हिस हे आहेत.
मनी हाइस्ट सिरीज सिझन ५ वोल्युम २ चा ट्रेलर प्रदर्शित परंतु चाहतावर्ग या ट्रेलरसाठी तयार नाही
अमुक तमुक एक बिल्डिंग बांधताना लहान मुलांचा बळी देणे, शेतीत धान्य जास्त मिळावे म्हणून अनेक क्रूर आणि अमानवीय गोष्टी आजही भारतातल्या विविध भागांमध्ये केल्या जातात. अंधश्रद्धा ही लहान लेकराचा जीव घ्यायला सांगते…इतकी कशी ती आंधळी असू शकते? हेच लपाछपी या सिनेमामध्ये दाखविण्यात आले होते. आता छोरी या सिनेमाद्वारे हा संदेश राष्ट्रीयस्तरावर मांडला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App