विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असणारा विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सुबोध भावे सांगताना म्हणतात, प्रत्येक भूमिका मला एक वेगळी ओळख निर्माण करुन देते. चौकटीपलीकडच्या भूमिका करण्यास मी नेहमीच प्राधान्य देतो. फुलराणी या चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी मला ऐकवली तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी त्यांना लगेचच होकार दिला.
The movie ‘Fullarani’ starring Subodh Bhave will be released in 2022
सुबोध भावे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचे एक मोशन पिक्चर आज प्रदर्शित केले आहे. या चित्रपटातली अभिनेत्री कोण आहे, याबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. ‘कोरोणाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याने खूप समाधान वाटते. 2022 मध्ये आधी चित्रपटगृहात आणि मग बाकी माध्यमातून फुलराणी चित्रपट करण्याचा मानस निर्मात्यांनी आखला आहे. असेदेखील सुबोध भावे यांनी आपल्या या पोस्टमधून सांगितले आहे.
https://www.instagram.com/reel/CWClzw8FIo5/?utm_source=ig_web_copy_link
Ganesh Ustav 2021:ऑलम्पिक विजेत्त्यांसह अवतरले बाप्पा ! सुबोध भावेची आगळी वेगळी कल्पना ; शेअर केले फोटो
1964 साली प्रदर्शित झालेल्या माय फेअर लेडी या म्युझिकल फिल्म वर आधारित हा सिनेमा असणार आहे. माय फेअर लेडी हा चित्रपट पॅदमलियान या गाजलेल्या नाट्यकलाकृतीवर आधारित होता. या प्रसिद्ध कलाकृतीवर आधारित फुलराणी हा एक अविस्मरणीय प्रेमकहाणी दर्शवणारा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन प्रयोग असणार आहे. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App