तालिबानच्या आश्वासनानंतरही अफगाणिस्तान मध्ये अफूची शेती सुरूच

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : मादक पदार्थांचे सेवन ही संपूर्ण जगाला भेडसावणारा एक प्रमुख समस्या आहे. मादक पदार्थाचे उत्पन्न करण्यामध्ये अफगाणिस्तान हा देश अग्रेसर मानला जातो. अमली पदार्थांच्या व्यापाराचे उच्चाटन करण्याच्या आणि अफूच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा तालिबानच्या हालचालींना अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Opium cultivation continues in Afghanistan despite Taliban assurances

अफूचे उत्पादन करणारा तालिबान हा एक सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तेथील लोक पाण्याच्या अभावी खसखस हे पीक घेतात. अपुरा पाणीपुरवठा, अपुरे पैसे यामुळे तेथील लोक पर्यायी उपजीविका म्हणून अफूची शेती करण्यावर भर देत आहेत. या शेतीतून 2019 मध्ये जवळपास 1,20,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. तर मागील वर्षभरामध्ये अफूची शेतीचे 37 टक्क्यांनी उत्पन्न वाढले होते. यामुळे अफगाणिस्तान देशाचा तो एक प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत बनला आहे. या वनस्पतीतुन निर्माण होणारी औषधे हा कोट्यवधी डॉलरचा एक उद्योगच आहे.

नुकताच असा अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवट आली आहे. 15 ऑगस्ट रोजी सत्तेत आल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले होते की, नवीन सरकार देशामध्ये अमली पदार्थांच्या व्यापाराला अजिबात परवानगी देणार नाही. आम्ही अमली पदार्थांच्या सक्तीविरोधात आहोत. अफगाणिस्तान इस्लामी व्याप्त प्रदेशात अमली पदार्थांचे उत्पादन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा संपूर्ण जग शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मदत करेल. त्यांना उपजीविकेसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात मदत करेल. असे जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले हाेते.


Prashant Bhushan again in the line of SC fire for equating Ramayana to ‘Opium’


बंडखोरीच्या काळात तालिबानने तस्करांवर कर लावून व्यापारातून प्रचंड मोठा नफा देखील कमावला होता. ही पध्दत त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षेत्रातील विविध प्रकारच्या उद्योगांवरही त्यांनी लागू केली होती. डेव्हिड मॅन्सफील्ड हे अफगाण मादक पदार्थांच्या व्यापारातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार या व्यापारातून 2020 मध्ये सुमारे 20 दशलक्ष इतका नफा कमावला गेला आहे. जे कर संकलनातून उत्पन्नाच्या इतर स्त्रोताच्या तुलनेत एक लहान अंश आहे. असे असताना तालिबानने मात्र नेहमीच पब्लिक प्लॅटफॉर्मवर या व्यापाराशी आपला कोणताही संबंध नाही असे वेळोवेळी सांगितले आहे.

Opium cultivation continues in Afghanistan despite Taliban assurances

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात