विशेष प्रतिनिधी
मुंबई: मनी हाईस्ट सीरिजमधील महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध पात्रांपैकी एक टोकियोचा मृत्यू झाल्यानंतर प्रेक्षकांना खूप दुःख झाले होते. आता सिरिजचा वोल्यूम-टू चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परंतु यामधील आणखी धक्के पचवण्यासाठी चाहतावर्ग तयार असेल असे दिसत नाही.
Money Heist part 5 volume 2 trailer released but fans aren’t ready for it
आता प्रोफेसरसुद्धा त्यांच्या टीमला परत सामील होऊन मोठ्या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. टीममधील सदस्य टोकियोच्या मृत्यूतून अजूनही सावरलेले नाहीत आणि त्यांची सुटका होण्याचे चान्सेस खूप कमी असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला असे दाखवण्यात आले आहे की बरलीन आणि अलिसीया गोळीबार करताना दिसत आहेत. परंतु त्यांचे लक्ष्य काय आहे हे मात्र स्पष्ट केलेले नाही.
फॉडा सीरिजच्या चौथ्या सिजनचे शूटिंग सुरू!
ट्रेलर बघितल्यानंतर असे दिसत नाही की प्रोफेसर आणि त्यांची टीम जिंकणार आहे. परंतु आपल्याला अजून हे कळले नाही की बर्लिनचा भूतकाळाचा प्रोफेसरच्या वर्तमानातील काही योजनांमध्ये काय रोल असणार आहे. परंतु या सगळ्यातून एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सिरीयलचा शेवट हा खूप धक्कादायक असणार आहे आणि चाहतावर्ग हा धक्का पचवू शकेल की नाही हे सांगता येत नाही. या सिरीजचा अधिकृत टेलर तुम्ही यूट्यूब वर पाहू शकता. नेटफलिक्सवर ३ डिसेंबरला या सिरीजचा फिनाले प्रदर्शित होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App