विशेष प्रतिनिधी
जोहान्सबर्ग : कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिकेने मद्यविक्री आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याची निर्णय घेतला आहे. या निर्बंधामागे डेल्टा विषाणू कारणीभूत असल्याचे सरकारने म्हटले आहे. झिम्बाब्वे, नामीबिया आणि मोझँबिक देशातही रुग्ण संख्या गतीने वाढत आहे. South Africa, Corona’s again, hospital beds began to fall short
देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने अनेक रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. देशात लसीकरण मोहिमेला वेग येत असून देशात कालपर्यंत २७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील १२ लाख ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ९,५०,००० पेक्षा अधिकांचे लसीकरण झाले आहे. जॉन्सन ॲड जॉन्सन आणि फायझरच्या लशीची मागणी वाढवली आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत सहा कोटी नागरिकांपैकी ६७ टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय दक्षिण आफ्रिका सरकारने ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App