विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट अंगावर घेऊ शकत नाहीत. ती क्षमता फक्त आपल्यातच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडचण झाली. म्हणूनच आपण महाविकास आघाडीत गेलो नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना लगावला. प्रकाश आंबेडकरांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे अक्षरशः वाभाडे काढले. दिल्लीतल्या “इंडिया” आघाडीच्या आजच्या सभेत ते सामील झाले नाहीत. Prakash Ambedkar’s procession from Nagpur
महाविकास आघाडीसोबत न जमल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मविआ आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. तसेच, त्यांनी आठ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीशी कुठे आणि का बिनसलं हे देखील सांगितले. महाविकास आघाडी ही थेट मोदी आणि भाजपला अंगावर घेत नाही, माझ्यात ती ताकद आहे, हेच त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी हाणला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
तुम्ही आधी तुमची भांडणं मिटवा म्हणजे आम्हाला मतदारसंघ मागायला सोपे होतील, अशी आम्ही सातत्याने भूमिका घेतली होती. पण, त्यांचेच भांडण मिटत नव्हते. म्हणून वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजे ते सांगत नाही, असं त्यांच्याद्वारे प्रसार माध्यमांमधून समोर येऊ लागले. जिथे त्यांचेच ठरत नाही तिथे आम्ही जाऊन आणखी बिघाड होण्याची परिस्थिती होती ती टाळण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही स्वतंत्र भूमिका घेतली.
काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देणार, असे पत्र आम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. कोल्हापूर, नागपूर जागांवरील पाठिंबाही जाहीर केला, इतर जागांबाबत त्यांच्याकडून निर्णय आल्यावर पाठिंबा जाहीर करु.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more